Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइलमध्ये दोनशेच्या वर चिनी अ‍ॅप; ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहिमेला वेग

मोबाइलमध्ये दोनशेच्या वर चिनी अ‍ॅप; ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहिमेला वेग

चीनने केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रभक्तीने जागृत झालेल्या तरुणांनी सोशल मीडियावर ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहीम गतिमान केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 02:08 AM2020-06-25T02:08:48+5:302020-06-25T06:45:50+5:30

चीनने केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रभक्तीने जागृत झालेल्या तरुणांनी सोशल मीडियावर ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहीम गतिमान केली आहे.

Over two hundred Chinese apps in mobile | मोबाइलमध्ये दोनशेच्या वर चिनी अ‍ॅप; ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहिमेला वेग

मोबाइलमध्ये दोनशेच्या वर चिनी अ‍ॅप; ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहिमेला वेग

सुदाम देशमुख
अहमदनगर : चीनचा नवा मोबाइल घेता क्षणीच त्यामध्ये काही अ‍ॅप आधीच इनबिल्ट असतात. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये किमान दहाच्यावर अ‍ॅपचा वापर सुरू असतो. सध्या मोबाइलच्या दुनियेत किमान दोनशेच्यावर चिनी अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज चीनला कोट्यवधी रुपयांची कमाई करून देण्यात भारतीयांचाही हातभार लागतो आहे. चीनने केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रभक्तीने जागृत झालेल्या तरुणांनी सोशल मीडियावर ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ मोहीम गतिमान केली आहे.
चिनी अ‍ॅपमध्ये ‘टिकटॉक’ हे अ‍ॅप सर्वात लोकप्रिय आहे. ते ‘मेड इन चायना’ असल्याची खबरबात वापरणाऱ्यांनाही नव्हती. मात्र आता सोशल मीडियावरही चीन आणि इतर देशांमधील अ‍ॅप कोणती आहेत, याची यादीच प्रसिद्ध झाली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात ‘टिकटॉक’च्या माध्यमातून नागरिकांनी मनोरंजन, प्रबोधन केले. मात्र तेच टिकटॉक चीनचे असल्याचे कळताच अनेकांनी ते मोबाइलमधून रिमूव्ह केले. तशी मोहीमच देशभरात तरुणांनी उघडली आहे. त्याला अल्पप्रतिसाद असल्याचे दिसते. टिकटॉकला टक्कर देण्यासाठी आता ‘चिंगारी’ हे अ‍ॅप बाजारात उतरले आहे. राजस्थानमधील काही तंत्रज्ञांनी ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ हे बाजारात आणले होते. ते अ‍ॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केल्यानंतर चिनी अ‍ॅपचा शोध घेऊन ते तत्काळ रिमूव्ह करण्याची सोय होती. मात्र चीनच्या दबावापोटी प्ले स्टोअरमधून ते अ‍ॅप रिमूव्ह करण्यात आले, असे येथील ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ची मोहीम राबविणारे सुजय मोहिते यांनी सांगितले. देशप्रेम असेल तर टिकटॉकसारखी अ‍ॅप रिमूव्ह करावीत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
>ही आहेत चिनी अ‍ॅप
शेअर इट, एक्सेण्डर, कॅमस्कॅनर, यूसी ब्राऊजर, टिकटॉक, हॅलो, लाइक, झूम, क्लब फॅक्टरी, यू-डिक्शनरी, पॅरलल स्पेस, व्हीवो व्हिडिओ, ब्यूटी प्लस आदी.
>ही आहेत भारतीय अ‍ॅप
जीओ स्वीच, अडोब स्कॅन, जीओ ब्राऊजर, रॉपोसो, से नमस्ते, फ्लिपकार्ट, अ‍ॅप क्लोनर, टाटा क्लीक, हिंदी-इंग्लिश डिक्शनरी, मिट्रॉन आदी.
>एखादे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याचा उपयोग करताना आपण इंटरनेट डेटा किती वापरतो, त्याचे विशिष्ट मूल्य निश्चित असते. उदा. ५०० एमबी डेटा वापरला तर वेगवेगळ्या कंपन्यांप्रमाणे १० ते ५०-६० रुपयांपर्यंत पैसे आकारणी होते. अ‍ॅप वापरताना त्यामध्ये असलेल्या जाहिरातीतूनही कमाई होते. हा सर्व पैसा चीनला मिळतो. हाच पैसा आता भारतावर हल्ला करणे, पाकिस्तानला चिथावणी देण्यासाठी वापरला जातो.
- प्रा. किरण सुपेकर, सायबर तज्ज्ञ

 

Web Title: Over two hundred Chinese apps in mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन