नीलेश शहाकार, बुलडाणापर्यावरण बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी, तसेच वनक्षेत्रातील मानवी हस्तक्षेप कमी करण्याच्या उद्देशाने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून वनेतर क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी वनेतर क्षेत्रात जैवविविधता व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने घेतला आहे. या माध्यमातून लोकसहभागातून ग्लोबल वार्मिंगवर मात करण्यात येणारआहे. ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे, ही हानी टाळण्यासाठी, तसेच वनेतर क्षेत्रातील पाणथळे, सरोवरे, जलाशय आदी ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हे जैवविविधतेचे व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ईको-टुरिझम, वनक्षेत्रामध्ये पर्यटन विका या योजनेशी मिळतीजुळते या योजनेचे स्वरूप असून आता यात लोकसहभाग घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कार्यक्रम राबविण्यासाठी महासंचालक, सामाजिक वनीकरण, पुणे यांनी राज्यात स्थळ निश्चिती केली असून सविस्तर अंदाजपत्रक व नकाशे यास तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेसाठी ६७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सप्टेंबर २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान कार्यक्रमावर हा निधी जिल्हानिहाय खर्च केला जाणारआहे.
लोकसहभागातून करणार ‘ग्लोबल ‘वार्मिंग’वर मात
By admin | Published: September 22, 2015 9:58 PM