मुंबई : बँक खाते उघडताना ग्राहकांना भेडसावत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यासंबंधीच्या नियमांचा फेरआढावा घेण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.
वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बँकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांनी त्यांना या मुद्याची माहिती दिली. बँक खाते उघडण्याचे नियम जाचक असल्याने लोकांची अडचण होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते ही समस्या दूर करण्यासाठी नियमांचा आढावा घेण्याची तयारी वित्त मंत्रालयाच्या अधिकाºयांनी दर्शविली. बँक खाते उघडण्यासाठी आपल्या पत्त्याचा पुरावा देणे बंधनकारक आहे. पत्त्यासाठी सहा दस्तावेजापैकी एक दस्तावेज लोक सादर करू शकतात.
बँक खात्यांच्या नियमांचा आढावा
बँक खाते उघडताना ग्राहकांना भेडसावत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन यासंबंधीच्या नियमांचा फेरआढावा घेण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:00 AM2019-10-04T04:00:47+5:302019-10-04T04:00:52+5:30