हैदराबादस्थित हॉस्पिटॅलिटी कंपनीने ओयो रूम्सचे (OYO Rooms) मालक ओरावेल स्टेज प्रायव्हेट लिमिटेडविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. (A Hyderabad-based hospitality company has filed an insolvency plea against Oravel Stays Pvt Ltd, the owner of Oyo Rooms.)
कॉन्क्लेव हॉटेलची मालकी असलेल्या कॉन्क्लेव इन्फ्राटेकने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या अहमदाबाद ब्रँचमध्ये दावा दाखल केला आहे. हे हॉस्पिटल ओयोने चालविण्यास घेतले होते. महत्वाचे म्हणजे एनसीएलटीने दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश 30 मार्चला दिले आहेत. M/S OYO Hotels and Home Pvt Limited च्या संचालकांना 15 एप्रिल 2021 आधी दिवाळखोरीचे पुरावे द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या आर्थिक गुंतवणूकदारांना त्यांचे दावे पुराव्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावे लागणार आहेत. अन्य गुंतवणूकदार त्यांची कागदपत्रे पोस्टाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देऊ शकणार आहेत. (Oyo Rooms (stylised as OYO), also known as Oyo Hotels & Homes, is an Indian hospitality chain of leased and franchised hotels, homes and living space)
यावर कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे प्रकरण 16 लाखांच्या कंत्राटी वादाचे आहे. हा वाद ओयोच्या या उपकंपनीचा नाहीय. तरी देखील एनसीएलटीने असे आदेश दिल्याने आम्हाला धक्का बसला आहे. या आदेशांविरोधात आम्ही अपिल केले आहे. एनसीएलटीने ओयोची उपकंपनी OHHPL ला दिवळखोर घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.
तत्पूर्वी कंपीनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीच्या खर्चातून कोरोना लसीकरण करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही लसीकरण केंद्रातून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटंबाने लसीकरण करावे, कंपनी त्या लसीकरणाचा खर्च देईल असे कंपनीने म्हटले होते.