Join us

पी-नोट्स गुंतवणूक ९ वर्षांच्या नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 4:15 AM

भारतीय भांडवली बाजारातील पार्टीसिपेटरी नोटस्च्या (पी-नोट्स्) माध्यमातून होणारी गुंतवणूक एप्रिलमध्ये घसरून १ लाख कोटी रुपयांवर आली.

नवी दिल्ली : भारतीय भांडवली बाजारातील पार्टीसिपेटरी नोटस्च्या (पी-नोट्स्) माध्यमातून होणारी गुंतवणूक एप्रिलमध्ये घसरून १ लाख कोटी रुपयांवर आली. हा गेल्या ९ वर्षांचा नीचांक ठरला आहे. याचा गैरवापर रोखण्यासाठी सेबीने या संबंधीचे नियम कडक केल्यामुळे ही घसरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.भारतीय शेअर बाजारात नोंदणी असलेले विदेशी खाते गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) पी-नोट्स जारी करू शकतात. बाजारात नोंदणी नसलेले विदेशी गुंतवणूकदार पी-नोट्स खरेदी करून गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी आता सेबीने कडक नियम बनविल्याने या गुंतवणुकीत घट झाल्याचे समजते.सेबीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय बाजारातील एकूण पी-नोट्स गुंतवणूक (समभाग, कर्ज आणि डेरिव्हेटिव्हज्) एप्रिल अखेरीस घसरून १,00,२४५ कोटींवर आली. आदल्या महिन्याच्या अखेरीस ती १,0६,४0३ कोटी रुपये होती. त्या आधी हा आकडा १,0६,७६0 कोटी रुपये होता. पी-नोट्समधील गुंतवणुकीचा हा आकडा जून २00९ नंतरचा नीचांकी आकडा ठरला आहे. त्या वेळी तो ९७,८८५ कोटींवर होता.सेबीच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात पी-नोटस्च्या माध्यमातून समभागांत ७२,३२१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. उरलेली गुंतवणूक कर्ज आणि डेरिव्हेटिव्हज् यामधील आहे. पी-नोटस्च्या माध्यमातून विदेशी खाते गुंतवणूक घसरून३ टक्के झाली आहे. आदल्या महिन्यात ती ३.४ टक्के होती.