नवी दिल्ली : आॅनलाइन नियुक्त्यांच्या वृद्धीदराची मासिक आधारावरील गती एप्रिलमध्ये काहीशी मंदावली आहे. तरीही या महिन्यात आॅनलाइन नियुक्त्यांत २८ टक्के वाढ झाली आहे.
मॉन्स्टर डॉट कॉम या संस्थेच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. मॉन्स्टर डॉट कॉमचा निर्देशांक एप्रिलमध्ये २४४ अंकांवर राहिला. गेल्या वर्षी याच महिन्यातील आकडेवारीच्या तुलनेत २८ टक्क्यांची वाढ त्यात दिसून येत आहे. त्याचवेळी मासिक आधारावरील आॅनलाइन नियुक्त्यांच्या वृद्धीदराची गती मात्र मंदावल्याचे दिसून येत आहे. मार्चमध्ये नियुक्त्यांतील वाढ ४२ टक्के होती. त्या तुलनेत एप्रिलमधील २८ टक्क्यांची वाढ चिंताजनक आहे.
सध्या देशातील उत्पादन आणि वस्तू उत्पादनाची स्थिती वाईट आहे. मॉन्स्टर डॉट कॉम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय मोदी यांनी सांगितले की, एक राष्ट्र म्हणून दीर्घकालीन लाभाच्या दृष्टीने आपण योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहोत. आता अधिक तार्किक रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेतला जात आहे. कौशल भारत योजना अधिक गतीने राबविली जात आहे. रोजगारात वाढ करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आॅनलाइन नियुक्त्यांची गती एप्रिलमध्ये मंदावली
आॅनलाइन नियुक्त्यांच्या वृद्धीदराची मासिक आधारावरील गती एप्रिलमध्ये काहीशी मंदावली आहे. तरीही या महिन्यात आॅनलाइन नियुक्त्यांत २८ टक्के वाढ झाली आहे.
By admin | Published: May 13, 2016 04:37 AM2016-05-13T04:37:17+5:302016-05-13T04:37:17+5:30