पान १- गुंतवणुकीसाठी मोदींचे कार्पोरेट जगताला आवाहन उद्योग क्षेत्र स्वच्छ करण्याची ग्वाही : ११ सीईओंसमवेत चर्चा
By admin | Published: September 29, 2014 9:46 PM
न्यूयॉर्क : भारतातील कोळसा खाणपेवाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ही एक संधी असून , तिचा फायदा घेऊन देशातील उद्योजक क्षेत्र आपण स्वच्छ करु असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील प्रमुख कार्पोरेट प्रमुखांना दिले व भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले.
न्यूयॉर्क : भारतातील कोळसा खाणपेवाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ही एक संधी असून , तिचा फायदा घेऊन देशातील उद्योजक क्षेत्र आपण स्वच्छ करु असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील प्रमुख कार्पोरेट प्रमुखांना दिले व भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले. अमेरिकेतील १५ प्रमुख उद्योजकांसाठी मोदी यांनी ब्रेकफास्ट मीटींग आयोजित केली होती. पेप्सिकोच्या मूळ भारतीय वंशाच्या सीईओ इंद्रा नूयी , गुगलचे अध्यक्ष एरिक श्मिड्ट व सीटी ग्रूपचे प्रमुख मायकेल कोर्बट हे या ब्रेकफास्ट बैठकीस उपस्थित होते. भारत खुल्या मनाचा आहे, आम्हाला बदल हवा आहे , आणि बदल एका बाजूने होत नाही, असे मोदी यावेळी म्हणाले. उद्योजकांच्या चिंता व प्रश्न मोदी यांनी ऐकून घेतले व भारतातील वातावरण व्यापारासाठी अधिक सोयीचे करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या चिंता व्यवस्थित ऐकून घेतल्या , भारतात कोणत्या क्षेत्रात प्रामुख्याने गुंतवणूक करता येईल हे सांगितले, ही बैठक अत्यंत चांगली व मोकळ्या वातावरणात झाली असे इंद्रा नूयी व कॉर्बट यांनी म्हटले आहे. भारत अधिक विकसित करण्यासाठी , देशाला पुढे नेण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत असे त्यानी सांगितले . सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात दिलेल्या निकालानुसार १९९३पासून विविध कंपन्याना दिलेल्या २१८ कोळसा खाणींपैकी २१४ खाणींचे वाटप रद्द केले आहे. यापैकी ४२ चालू असणार्या कंपन्या सरकारने हाती घ्याव्यात असेही या निकालात म्हटले आहे. हा निकाल देशातील व्यापारी क्षेत्रासाठी धोकादायक ठरेल अशी काळजी व्यक्त केली जात असताना पंतप्रधान मोदी यांनी निकालाचा असा वेगळा अर्थ लावला आहे.