पान १ - काँग्रेस प्रचार
By admin | Published: September 30, 2014 9:39 PM
महाराष्ट्रावर मोदी सूड उगवत आहेत
महाराष्ट्रावर मोदी सूड उगवत आहेतपृथ्वीराज चव्हाणांचा हल्ला : काँग्रेसच्या प्रचाराचा तुळजापुरात शुभारंभउस्मानाबाद : सागरी सुरक्षा अकॅडमीसारखे अनेक प्रकल्प गुजरातकडे वळविले जात आहेत. अवघ्या पंधरा दिवसांवर निवडणूक असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करुन महाराष्ट्रावर सूड उगवला जात असून मंुबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र रचणार्या मोदींना राज्यातील जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. श्रीक्षेत्र तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून एकप्रकारे भाजपासोबत हातमिळवणी केली, असा आरोपही चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणार्या नरेंद्र मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल, असा सवाल करीत गुजरातकडे जाणारी मंुबई महाराष्ट्राने १०५ जणांचे हौतात्म्य देवून मिळविली आहे. त्याचाच सूड मोदी उगवत असून, केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तीन विभाग गुजरातला नेले आहेत. मंुबईतील गोदी बंदरही गुजरातमध्ये हलविले असून, यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, तुळजापूर येथील काँग्रेस उमेदवार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)