ददा वासवानी : ‘स्टे कनेक्टेड’ विषयावर व्याख्यान मडगाव : जगात सगळीकडे अंधकार पसरला आहे. याचे कारण मनुष्य देवापासून दूर गेला असून या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने देवाशी जोडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन तत्त्वज्ञ दादा वासवानी यांनी केले.मडगाव येथील रवींद्र भवनात अखिल गोवा सिंधी व दादा वासवानी गोवा यात्रा फोरमतर्फे ‘स्टे कनेक्टेड’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. या वेळी त्यांनी काही प्रात्यक्षिक उदाहरणे सांगितली. सकाळी उठल्यावर चांगले विचार नित्य मनात आणावेत. शास्त्राचा श्लोक मनात आणावा. त्याचे दिवसभर चिंतन करावे. माणसाने नेहमी परमेश्वराशी जोडले गेले पाहिजे. रात्रीच्या वेळी झोपताना चांगल्या साहित्याचे वाचन करावे. त्यामुळे स्वप्ने चांगली पडतात, असे ते म्हणाले. मनुष्याने दिवसभर कामाच्या तणावापासून मुक्त राहावे. जास्त काम करू नये. जास्त काम केल्यास मनुष्याला राग येतो. तसेच त्याची सहनशीलताही संपते. हा कार्यक्रम दोन सत्रांत झाला. दुसर्या सत्रात प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. यात अनेक लोकांनी आपल्या समस्यांविषयी प्रश्न विचारले. त्याचे वासवानी यांनी निरसन केले. (प्रतिनिधी)
पान 2 - महत्त्वाची बातमी - मनुष्याने देवाशी जोडले जावे
दादा वासवानी : ‘स्टे कनेक्टेड’ विषयावर व्याख्यान
By admin | Published: August 10, 2015 12:28 AM2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30