वद्यालय स्वच्छतेची मोहीम सुरूपणजी : गांधी जयंतीच्या निमित्ताने गोवा सरकारच्या शिक्षण खात्याच्या सूचनेनंतर राज्यातील विद्यालयांमध्ये ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय मोहीम’ सुरू झाली असून 31 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील तसेच विद्यालय व परिसर स्वच्छ केला जाईल. महात्मा गांधींच्या विचारसरणीप्रमाणे स्वच्छता व निर्मळतेला प्राधान्य देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समूहाद्वारे विद्यालयाच्या आवाराची स्वच्छता करून घेतली जाईल. शाळेतील वर्ग, वाचनालय आणि प्रयोगशाळा स्वच्छ केल्या जातील. शाळेच्या आवारात असलेल्या पुतळ्यांची स्वच्छता विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाईल. तसेच शौचालय व पिण्याचे पाणी पुरविणारी यंत्रे व परिसर स्वच्छ केला जाईल. मैदानाची स्वच्छता, विद्यालयातील समानाची खोली साफ केली जाईल. विद्यालयातील फुलबागेची निगा आणि स्वच्छता करून घेतली जाईल तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला, चर्चात्मक कार्यक्रम इत्यादी उपक्रम घेतले जातील. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी विद्यार्थ्यांचेच समूह तयार केले जातील. शिक्षण खात्याकडून याबाबतची सूचना सर्व सरकारी, खासगी शैक्षणिक संस्थांना पाठविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पान 3 विद्यालय स्वच्छतेची मोहीम सुरू
विद्यालय स्वच्छतेची मोहीम सुरू
By admin | Published: September 29, 2014 09:47 PM2014-09-29T21:47:03+5:302014-09-29T21:47:03+5:30