Join us  

अंदर की बात! ३०० रुपये गुंतवणाऱ्यांना ४० हजारांचा फायदा; इनरवेअरच्या कंपनीनं केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:34 PM

Page Industries Share Price : इतकंच नाही तर कंपनीनं गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश देण्याचा घेतला निर्णय.

Page Industries Stock Price : सुमारे 15 वर्षांपूर्वी इनरवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरची किंमत 300 रुपयांच्या पातळीवर होती, परंतु आता ती 41 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना 15,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. ज्या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना इतका नफा मिळवून दिला आहे त्या कंपनीचं नाव पेज इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. आता कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. यासोबतच पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

पेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा 13.58 टक्क्यांनी वाढून 174.57 कोटी रुपये झाला आहे. 'कंपनीने एका वर्षापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 153.70 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 927.06 कोटी रुपयांच्या तुलनेत या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल 28.34 टक्क्यांनी वाढून तो 1,189.80 कोटी रुपये झाला आहे. याशिवाय, कंपनी प्रति इक्विटी शेअरवर 100 रुपये लाभांश देईल,' असे पेज इंडस्ट्रीजने बीएसई फाइलिंगमध्ये सांगितले.

शेअरची किंमतपेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरच्या किमतीबद्दल सांगायचे झाले तर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ 15 वर्षांमध्ये झाली आहे. यापूर्वी कंपनीच्या शेअरनं 45,162 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु सध्या पेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 3.41 टक्क्यांनी घसरून 40946.55 रुपयांवर आला आहे.

कुठपर्यंत आहे विस्तार?पेज इंडस्ट्रीज ही भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूतान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये उत्पादन, वितरण आणि विपणनासाठी जॉकी इंटरनॅशनल इंकची (यूएसए) संलग्न संस्था आहे. ही कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी स्पीडो इंटरनॅशनलसोबत काम करत आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक