Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यामुळे बहुतांश पर्यटक आपल्या काश्मीरच्या बुकिंग्स रद्द करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:30 IST2025-04-23T19:29:52+5:302025-04-23T19:30:32+5:30

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यामुळे बहुतांश पर्यटक आपल्या काश्मीरच्या बुकिंग्स रद्द करत आहेत.

Pahalgam Attack: Kashmir's economy hit by Pahalgam attack; Tourists cancel bookings | पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

Pahalgam Attack: उन्हाळ्यात हजारो पर्यटक जम्मू-काश्मीर फिरायला जातात, पण काल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कालच्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटक आपले काश्मीर दौरे रद्द करत आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या चोवीस तासांत काश्मीर ट्रिप रद्द करण्याच्या विनंत्या सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. लोकांमध्ये भीती इतकी आहे की, ते आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणांकडे वळत आहेत.

टूर ऑपरेटर्स काय म्हणाले?
एनडीटीव्हीशी बोलताना, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष राजीव मेहरा म्हणाले की, काश्मीरसाठी बुकिंग वेगाने रद्द केले जात आहे. तर, पी.पी. देशांतर्गत टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे प्रमुख खन्ना म्हणाले की, श्रीनगर आणि गुलमर्गला जाणारे सुमारे 30-40 टक्के पर्यटक त्यांचे डेस्टिनेशन बदलण्याची मागणी करत आहेत. 

दिलासादायक बाब म्हणजे, विमान कंपन्या आणि हॉटेल्स सर्व पर्यटकांना पूर्ण परतफेड करत आहेत. यामुळे पर्यटकांना प्रवास पुढे ढकलण्यात किंवा त्यांचे डेस्टिनेशन बदलण्यात फारशी अडचण येत नाही.

370 हटवल्यानंतर पर्यटन शिगेला पोहोचले होते...
कलम 370 रद्द केल्यानंतर आणि कोव्हिडनंतरच्या काळात काश्मीर पर्यटन वाढले होते. 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये 2.35 कोटी पर्यटक आले होते. एप्रिल-मे दरम्यान हॉटेल्स, हाऊसबोट्स आणि गेस्ट हाऊस पूर्णपणे बुक झाले होते. श्रीनगरला जाणाऱ्या विमानांच्या बुकिंगमध्येही 50-100 टक्के वाढ झाली होती. पण, आता कालच्या घटनेनंतर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का धक्का बसला आहे.

Web Title: Pahalgam Attack: Kashmir's economy hit by Pahalgam attack; Tourists cancel bookings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.