Lokmat Money > बिझनेस न्यूज > बापरे! पाकमध्ये पेट्रोल 12 आणि डिझेल 10 रुपयांनी महागले

बापरे! पाकमध्ये पेट्रोल 12 आणि डिझेल 10 रुपयांनी महागले

Pakistan increases petroleum prices : पाकिस्तान सरकारने आता पेट्रोलियम पदार्थांचे (Petroleum Products) दर प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी वाढवले ​​आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 03:13 PM2022-02-16T15:13:28+5:302022-02-16T15:14:34+5:30

Pakistan increases petroleum prices : पाकिस्तान सरकारने आता पेट्रोलियम पदार्थांचे (Petroleum Products) दर प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी वाढवले ​​आहेत.

Pakistan increases petroleum prices by Rs 12.03 per litre | बापरे! पाकमध्ये पेट्रोल 12 आणि डिझेल 10 रुपयांनी महागले

बापरे! पाकमध्ये पेट्रोल 12 आणि डिझेल 10 रुपयांनी महागले

पाकिस्तानात (Pakistan) महागाई दिवसेंदिवस नवनवे विक्रम करत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानातील जनतेला महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सरकारने आता पेट्रोलियम पदार्थांचे (Petroleum Products) दर प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी वाढवले ​​आहेत.

हायस्पीड डिझेलच्या दरातही वाढ
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 12.03 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय हायस्पीड डिझेलच्या (High Speed Diesel) दरात प्रतिलिटर 9.53 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोलचा दर पोहोचला160 रुपये प्रति लिटर
पाकिस्तानमध्ये लाइट डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.43 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रॉकेलही प्रतिलिटर 10.08 रुपयांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर 147.82 रुपयांवरून 159.86 रुपये प्रति लिटर झाला आहे.

रॉकेलचा भाव 126.56 रुपयांवर
याचप्रमाणे हायस्पीड डिझेलचा दर 144.62 रुपयांवरून 154.15 रुपये प्रति लिटर झाला आहे. लाइट डिझेल तेलाचे (Light Diesel Oil) दर प्रतिलिटर 114.54 रुपयांवरून 123.97 रुपये झाले आहेत. रॉकेलचा दर प्रतिलिटर 116.48 रुपयांवरून 126.56 रुपयांवर पोहोचला आहे.

16 फेब्रुवारीच्या मध्यरात्री नवीन दर लागू होतील
द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्यानंतर येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलियम उत्पादनांचे नवीनतम दर 16 फेब्रुवारी मध्यरात्री ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू होतील.

Web Title: Pakistan increases petroleum prices by Rs 12.03 per litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.