नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्राेलचा दर १० रुपयांनी वाढविण्यात आला आहे. तेथील चलनानुसार पेट्राेलचा दर २८२ रुपये प्रतिलिटर आहे. मात्र, विनिमय दरानुसार भारताच्या तुलनेत पाकिस्तानात पेट्राेल स्वस्त आहे. भारतीय चलनानुसार, पाकिस्तानात पेट्राेलचा दर ८१.७० रुपये प्रतिलिटर आहे. तर भारतात सरासरी १०४ रुपये प्रतिलिटर एवढा दर आहे.
सर्वात स्वस्त पेट्राेल कुठे?
जगात सर्वात स्वस्त पेट्राेल व्हेनेझुएला येथे आहे. तर हाँगकाँग, सीरिया आणि आइसलँड येथे सर्वात महाग पेट्राेल आहे. जगभरात सरासरी १०८.७६ रुपये प्रतिलिटर असा पेट्राेलचा दर आहे.
इतर देशांतील पेट्राेलचे दर
(भारतीय चलनानुसार)
अमेरिका ८४.०६
रशिया ५१.५७
ब्रिटन १४८.५८
व्हेनेझुएला १.३०
लीबिया २.५७
इराण ४.३८
हाँगकाँग २४२.९४
सीरिया १९२.४६
आइसलँड १९२.३०