Pakistan Richest Person : भारतावर कायम कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानची अवस्था सध्या फारच वाईट आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली असून दुसऱ्या देशांच्या उपकारावर जगावे लागत आहे. इथं लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. दहशतवाद आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे हा देश संकटात सापडला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान रोखीचे संकट आणि महागाईशी झुंजत आहे. या शेजारील देशात अनेक अब्जाधीश उद्योगपती आहेत, ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पण भारतातील अब्जाधीश उद्योगपतींच्या तुलनेत ते अजूनही खूप पिछाडीवर आहेत.
पाकिस्तानची भारतासोबत सोडा, इथल्या उद्योगपतींसोबतही तुलना होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीला, एका भारतीय उद्योगपती महिलेने धोबीपछाड दिली आहे. बाकी अब्जाधीश लोकांबद्दल तर बोलायलाच नको. भारतातील सर्वात श्रीमंत महिला आणि नेटवर्थच्या बाबतीत तिसरी सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती सावित्री जिंदाल यांची संपत्ती पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती शाहिद खान यांच्यापेक्षा तिप्पट आहे.
शाहिद खान यांची संपत्ती पाकिस्तानमध्ये सर्वाधिक आहे. त्यांची एकूण संपत्ती १ लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. जगातील इतर व्यावसायिकांप्रमाणे शाहिद खान देखील अनेक प्रकारचे व्यवसाय करतात. ७४ वर्षीय शाहिद खान हे पाकिस्तानी-अमेरिकन अब्जाधीश व्यापारी आहेत. ते ऑटो पार्ट्स सप्लायर फ्लेक्स-एन-गेटचे मालक आहेत. खान यांच्या कंपनीत २५,००० हून अधिक लोक काम करतात. या व्यावसायिक फर्मची अनेक देशांमध्ये ६९ उत्पादन केंद्रे आहेत. याशिवाय शाहिद खान स्पोर्ट्स टायकून देखील आहे. ते खेळाशी संबंधित संघांमध्ये पैसे गुंतवतात. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती १३.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स किंवा १११६७४ कोटी रुपये आहे.
सावित्री जिंदाल यांची संपत्ती किती?शाहिद खान यांची एकूण संपत्ती १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर भारतातील सर्वात श्रीमंत महिला आणि तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती सावित्री जिंदाल यांची संपत्ती ३.६६ लाख कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत सावित्री जिंदाल यांच्याकडे शाहिद खानपेक्षा ३ पट जास्त संपत्ती आहे. नुकत्याच झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत सावित्र जिंदाल यांनी हिसार विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सावित्री यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.