Join us  

महागाईचा पुन्हा बसणार झटका! पाम तेलाने चिंता वाढवली, खाद्यतेल महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:45 AM

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पामचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पामचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पामच्या उत्पानावर मोठा फरक पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खाद्यातेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. 

या वर्षातील मार्च महिन्यात तेलाचे दरात मोठी वाढ जाली होती, पण पुन्हा काही दिवसांनी तेलाचे दर कमी झाले. पण आता पुन्हा एकदा दरात वाढ होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

दहा राज्यांनी मोडली आर्थिक शिस्त; आरबीआयने व्यक्त केली चिंता

पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने सर्व प्रकारचे खाद्यतेल महाग होणार आहे. खाद्यतेल बनवण्यासाठी पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचप्रमाणे बिस्किटे, नूडल्स आदी खाद्यपदार्थही महागणार आहेत. पामचे तेल साबण बनवण्यासाठीही वापरले जाते. पामतेल महाग झाल्याने या सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे.  

पामतेल महागल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे पाम तेलाचे घटणारे उत्पादन आणि वाढत्या निर्यातीमुळे इंडोनेशिया आणि मलेशियासारख्या उत्पादक देशांचा साठा कमी होऊ शकतो. अशा परीस्थितीत पामतेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात.

भारताने नोव्हेंबर महिन्यासाठी पाम तेलाचा आयात दर ७७६ डॉलर प्रति टन निश्चित केला आहे. यात खर्च, विमा आणि वाहतूक यांचाही समावेश आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेल आयातदार देश आहे. जानेवारी महिन्यात १०१० डॉलर प्रति टन ऑर्डर केले होते.

इंडोनेशियाने जुलैमध्ये निर्यात कर रद्द केला कारण वाढत्या साठ्यामुळे पाम तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. मार्चमध्ये त्याची किंमत २०१० डॉलर प्रति टन झाली होती. पण नंतर त्यात मोठी घसरण दिसून आली. 

टॅग्स :महागाईतेल शुद्धिकरण प्रकल्पअन्न