पान १- पन्नीरसेल्वम तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री
By admin | Published: September 28, 2014 10:29 PM
चेन्नई : अण्णाद्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या संदर्भात शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर रविवारी जयललिता यांचे निष्ठावंत आणि तामिळनाडूचे वित्तमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची रविवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
चेन्नई : अण्णाद्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या संदर्भात शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर रविवारी जयललिता यांचे निष्ठावंत आणि तामिळनाडूचे वित्तमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची रविवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली. २००१ मध्ये अशाचप्रकारची परिस्थिती निर्माण झाली असताना जयललिता यांनी पन्नीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. जयललितांना शिक्षा सुनावण्यात आल्याच्या दुसर्याच दिवशी रविवारी ६३ वर्षीय पन्नीरसेल्वम यांची अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी अविरोध निवड करण्यात आली. तामिळनाडूत प्रबळ असलेल्या मुदुकुलाथोर समाजाचे नेते असलेले पन्नीरसेल्वम हे जयललितांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.सत्तारूढ अण्णाद्रमुक पक्षाच्या आमदारांनी सायंकाळी राज्यपाल के. रोसय्या यांना भेटून पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्याचा आपला निर्णय कळविला. शनिवारीच जयललिता यांनी निकालानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून पन्नीरसेल्वम यांचे नाव सुचविले होते. तसेच बेंगळुरूच्या कारागृहात जाण्याआधी त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेले पन्नीरसेल्वम यांच्याशी विस्तृत चर्चाही केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. (वृत्तसंस्था)