Join us

PAN-Aaadhaar Link : १ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा १ एप्रिलपासून पॅन कार्ड कामाचं राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:35 AM

तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करायचा नसेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करायचा नसेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. आयकर विभागाने ट्वीट करून पॅन कार्डधारकांना सतर्क केले आहे. विभागाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे की 31 मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा (Pan-Aadhaar Link). तसे न झाल्यास 1 एप्रिलपासून कार्ड निष्क्रिय केले जाईल.

आयकर विभागाने मंगळवार, 17 जानेवारी रोजी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पॅनकार्डधारकांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 'आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारकांना (जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत) 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. लिंक न केलेला पॅन 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होईल.  'Urgent Notice. Don’t delay, link it today!' असं विभागाने यात लिहिले आहे.

… तर समस्यांचा सामना करावा लागेलआयकर विभागाचा हा संदेश हलक्यात घेणे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. याचे कारण म्हणजे आजच्या काळात पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, जे तुमच्या प्रत्येक आर्थिक बाबींशी जोडलेले राहते. विभाग या कार्डवर नोंदवलेल्या क्रमांकाद्वारे कार्डधारकांचा संपूर्ण आर्थिक डेटा रेकॉर्ड करतो. अशा परिस्थितीत, हा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, अन्यथा आपण आणखी अडचणीत येऊ शकता.

पॅन निष्क्रीय झालं तर…जर तुम्ही तुमचा पॅन 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केला नसेल (Pan-Aadhaar Link Last Date) आणि ते 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय झाले, मग अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकणार नाही. समस्या इथेच संपणार नाही, कारण पॅन कार्ड अवैध असल्यास, तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक, बँक खाते उघडू शकणार नाही, जेथे पॅन कार्ड दाखवणे अनिवार्य आहे.

असं करा घरबसल्या कामप्राप्तिकर विभागाच्या Incometax.gov.in/ या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुमचा पॅन क्रमांक युझर आयडी म्हणून वापरावा लागेल. तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख यासह लॉग इन केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे Link Aadhaar चा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार आणि पॅन कार्डची माहिती विचारली जाईल. विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि प्रक्रिया पूर्ण करा. याशिवाय एसएमएस सुविधेचा वापर करून तुम्ही हे काम सहज करू शकता.

टॅग्स :इन्कम टॅक्सआधार कार्डपॅन कार्ड