Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar Link to PAN : सरकारने वसूल केला ६०० कोटी रुपयांचा दंड! तुमचं आधार पॅनशी लिंक आहे का? नसेल तर घरबसल्या करा

Aadhaar Link to PAN : सरकारने वसूल केला ६०० कोटी रुपयांचा दंड! तुमचं आधार पॅनशी लिंक आहे का? नसेल तर घरबसल्या करा

Aadhaar Link to PAN : पैशांच्या व्यवहारांपासून ते आयटीआर भरण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड वापरले जाते. सरकारने प्रत्येकासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:27 AM2024-11-15T11:27:16+5:302024-11-15T11:28:04+5:30

Aadhaar Link to PAN : पैशांच्या व्यवहारांपासून ते आयटीआर भरण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड वापरले जाते. सरकारने प्रत्येकासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे.

pan aadhaar link government collected a fine of 600 crores check your aadhaar is linked to pan or not | Aadhaar Link to PAN : सरकारने वसूल केला ६०० कोटी रुपयांचा दंड! तुमचं आधार पॅनशी लिंक आहे का? नसेल तर घरबसल्या करा

Aadhaar Link to PAN : सरकारने वसूल केला ६०० कोटी रुपयांचा दंड! तुमचं आधार पॅनशी लिंक आहे का? नसेल तर घरबसल्या करा

PAN-Aadhaar Link : कुठल्याही बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आधारला पॅनकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत संपली आहे. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ होती. यानंतर पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी सरकार दंड आकारत आहे. १ जुलै २०२३ पासून केंद्र सरकार निष्क्रिय पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी १,००० रुपये दंड आकारत आहे. आतापर्यंत सरकारने एकूण ६०१.९७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशा परिस्थितीत तुमचं पॅन आधारशी लिंक आहे का? नसेल तर ते कसे लिंक करायचे? याची प्रक्रिया समजून घ्या. हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन करू शकता.

सर्वात अगोदर तुमचे पॅन आधारशी लिंक आहे की नाही? हे तपासून घ्या.

  • ई-फायलिंग पोर्टलवर, क्विक लिंक्स विभागात आधार स्टेटसवर क्लिक करा.
  • तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि आधार स्थिती पाहा या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या स्क्रिनवर आधार लिंक स्थितीशी संबंधित एक संदेश दिसेल.

SMS द्वारेही तपासता येते
आधारशी लिंक केलेल्या पॅन कार्डची स्थिती जाणून घेण्यासाठी, UIDPAN < 12 अंकी आधार क्रमांक>< 10 अंकी पर्मनंट अकाउंट नंबर>. जर तुमचे पॅन कार्ड आधारशी जोडलेले असल्यास, तुम्हाला 'Aadhaar... is already associated with PAN (number) in ITD database' हा संदेश मिळेल. अन्यथा तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नाही, असा अर्थ होतो.

पॅन लिंक नसेल तर दंड कसा भरायचा 

  1. ई-फायलिंग पोर्टलच्या होम पेजवर जा आणि क्विक लिंक्स विभागात आधार लिंकवर क्लिक करा. वैकल्पिकरित्या, ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा आणि प्रोफाइल विभागात आधार लिंकवर क्लिक करा.
  2. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका.
  3. ई-पे टॅक्सद्वारे पेमेंट सुरू ठेवा वर क्लिक करा.
  4. तुमचा पॅन आणि ओटीपी प्राप्त करण्यासाठी मोबाईल नंबर एंटर करा.
  5. ओटीपी पडताळणीनंतर, तुम्हाला ई-पे टॅक्स पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
  6. Proceed on Income Tax पर्यायावर क्लिक करा.
  7. संबंधित मूल्यांकन वर्ष आणि पेमेंट प्रकार Other Receipts (500) निवडा आणि Continue वर क्लिक करा.
  8. आता चलन तयार होईल. तुम्हाला पेमेंट पद्धत निवडावी लागेल. यानंतर तुम्ही निवडलेल्या पद्धतीने तुम्ही यूपीआय किंवा बँकेच्या साईटवर जाऊन पमेंट करू शकता.
  9. शुल्क भरल्यानंतर तुम्हीई-फाइलिंग पोर्टलवर आधारला पॅनकार्ड लिंक करू शकता.
     

Web Title: pan aadhaar link government collected a fine of 600 crores check your aadhaar is linked to pan or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.