नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी केंद्र सरकारकडून आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 देण्यात आली होती.
यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. सध्याची कोरोना परिस्थिती पाहता पॅन-आधार लिंक 31 मार्च 2021 पर्यंत करता येणार आहे, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या निर्णयानंतर पॅन कार्डआधार कार्डाशी जोडणे अनिवार्य झाले आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही नवीन पॅनसाठी अर्ज करत असाल तरी देखील आधार कार्डवरील 12 अंकी नंबर देणे आवश्यक असते.
दरम्यान, नवीन पॅनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर आपोआप तुमचे पॅन आधारशी लिंक होईल. तर सध्या ज्यांच्याकडे पॅन आहे, त्यांना डेडलाइनआधी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे पॅन निष्क्रिय होईल, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली होती.
आधार-पॅन लिंकिंग कसे कराल?
- आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
- तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.
- तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.
- 'View Link Aadhaar Status' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
- याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
- UIDPAN आधार क्रमांक पॅन क्रमांक हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.
आणखी बातम्या...
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"
21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत