केंद्र सरकारनंआधार कार्ड आणि पॅन कार्ड (Aadhaar card and Pan Card linking) लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी पॅन आधार लिंक करण्याची अखेरची तारीख ही ३० सप्टेंबर ही होती. केंद्र सरकारनं आता याला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली असून आता पॅन आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही अखेरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
जर तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन आधार लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन निष्क्रिय होणार आहे. याशिवाय तुमच्याकडून दंडही आकारला जाईल. इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ मध्ये कलम २३४(२३एच) जोडण्यात आलं आहे. याअंतर्गत त्यात दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारनं २३ मार्च रोजी लोकसभेत पारित केलेल्या फायनॅन्स बिल २०२१ द्वारे ही तरतूद केली आहे.
कसं कराल लिंक?जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक होईल. एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN म्हणजेच तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी पॅनकार्ड क्रमांक टाईप करा आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक जाईल. यानंतर तुम्हाला https://www1.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळावर जाऊन लिंक आधार यावर क्लिक केल्यानंतर माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक झालं आहे की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल.