नवी दिल्ली : जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) लिंक केले नसेल, तर आता तुम्हाला या कामासाठी दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 1 जुलै 2022 पासून पॅन-आधार लिंक करण्यासाठी लागणारा दंड दुप्पट करण्यात आला आहे. 30 जून 2022 पर्यंत पॅन-आधार लिंकिंग दंड 500 रुपये होता, मात्र 1 जुलैपासून तो 1000 रुपये करण्यात आला आहे.
पॅन कार्डआधार कार्डशी कसे लिंक करावे?
- सर्वात आधी आयकर विभागाच्या नवीन वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/portal वर जा. पेजवर तळाशी दिलेल्या आधार लिंक वर क्लिक करा.
- तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी Click Here वर क्लिक करा. येथे तुम्हाला आधार आणि पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील.
- जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले असेल तर Your PAN is linked to Aadhaar Number असे दिसून येईल.
- जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
असा भरावा लागेल दंड!
स्टेप 1: पॅन-आधार लिंकिंगसाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean या पोर्टलला भेट द्या.
स्टेप 2 : पॅन-आधार लिंकिंग रिक्वेस्टसाठी CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.
स्टेप 3: Tax Applicable निवडा.
स्टेप 4 : मायनर हेड 500 (फी) आणि मेजर हेड 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त इन्कम टॅक्स) अंतर्गत सिंगल चालानमध्ये फी भरणे सुनिश्चित करा.
स्टेप 5 : नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
स्टेप 6 : पॅन क्रमांक प्रविष्ट करा, असेसमेंट इयर निवडा आणि पत्ता प्रविष्ट करा.
स्टेप 7: कॅप्चा प्रविष्ट करा आणि Proceed टॅबवर क्लिक करा.