नवी दिल्लीः पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता आधार कार्ड पॅन कार्डला 31 जुलैपर्यंत जोडावं लागणार आहे. 31 जुलैपूर्वी आपण पॅनला आधार कार्ड लिंक न केल्यास आपल्याला रिटर्न फाइल करता येणार नाही. आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळानं आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 सप्टेंबर 2019पर्यंत वाढवली आहे. परंतु रिटर्न फाइल करणाऱ्यांना 31 जुलैपूर्वीच पॅन आणि आधार लिंक करावं लागणार आहे. अन्यथा त्यांना रिटर्न फाइल करता येणार नाही.
तसेच कुठूनही येणारा कर परतावाही अडकून पडू शकतो. त्याचबरोबर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं 31 मार्च 2019पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यास सांगितलं होतं. परंतु ती मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं वाढवली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2019पर्यंत आपल्याला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करता येणार आहे. परंतु तरीही 1 एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीनं स्पष्ट केलेलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ‘आधार’सक्तीच्या मुदतीत वाढ करण्याचे निर्देश केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी)जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आयकर भरताना आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे असेल. केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९अ हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आले आहे. बोगस कागदपत्राच्या आधारे पॅन कार्ड तयार केली जातात. त्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रानं हा तोडगा काढला. त्यासाठीच आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली.
असं करा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक
पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ब्राऊझरवरून प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) ला भेट द्या. वेबसाइटला भेट दिल्यानंतर डाव्या बाजूला दिला गेल्ल्या लाल रंगाच्या लिंक आधार या टॅबवर क्लिक करा. जर आपलं खात नसल्यास नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर एक पेज खुल होईल. त्यावर निळ्या अक्षरात दिलेल्या टॅबवर क्लिक करून प्रोफाइल सेटिंग निवडा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.