रूपेश उत्तरवार, यवतमाळ केंद्र शासनाने दोन लाखांपेक्षा अधिक किमतीच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती केली आहे. कोणत्या व्यक्तीने किती सोने खरेदी केले हे स्पष्ट होणार असल्याने आयकर बुडविणे कठीण जाणार आहे. पॅनकार्डमुळे सोने खरेदी करणाऱ्यांची माहिती मिळणार आहे. यामुळे सराफा व्यावसायिक पक्के बिल फाडणार नाही. उलट कच्चे बिल फाडले जातील. यामुळे शासनाचा कर मोठ्या प्रमाणात बुडण्याचा धोका आहे. यामुळेच पॅनकार्डची सक्ती १० लाख रूपयांच्या सोने खरेदीनंतर करण्यात यावी, अशी मागणी सुवर्णकार संघटनांकडून केली जात आहे. सुवर्णकारांची देशभरात तीन लाख आणि महाराष्ट्रात ४० हजार दुकाने आहेत. या ठिकाणावरून दर दिवसाला दोन हजार किलो सोन्याची उलाढाल होते. ही उलाढाल ५४ कोटींच्या घरात आहे. मोडीचे सोने व अंतर्गत सोने अशी संपूर्ण उलाढाल १०० कोटींच्या घरात आहे. यातून १ कोटी २० लाखांचा कर शासानाला दर दिवसाला मिळतो.
२ लाखांपेक्षा अधिक सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्ती
By admin | Published: February 06, 2016 3:00 AM