Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॅनकार्ड धारकांनी 'हे' काम केल्यास होईल तुरुंगवास किंवा 10 हजारांचा दंड! जाणून घ्या, नियम...

पॅनकार्ड धारकांनी 'हे' काम केल्यास होईल तुरुंगवास किंवा 10 हजारांचा दंड! जाणून घ्या, नियम...

PAN Card : पॅनकार्डशी संबंधित असा नियम आहे की, जो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:56 PM2022-10-06T15:56:57+5:302022-10-06T15:59:35+5:30

PAN Card : पॅनकार्डशी संबंधित असा नियम आहे की, जो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

pan card holders should be aware about this it rule otherwise has to face jail or 10k penalty | पॅनकार्ड धारकांनी 'हे' काम केल्यास होईल तुरुंगवास किंवा 10 हजारांचा दंड! जाणून घ्या, नियम...

पॅनकार्ड धारकांनी 'हे' काम केल्यास होईल तुरुंगवास किंवा 10 हजारांचा दंड! जाणून घ्या, नियम...

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पॅनकार्ड (PAN Card) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पॅन म्हणजेच Permanent Account Number (PAN) सध्या सर्वांसाठी एक आवश्यक डॉक्युमेंट बनले आहे. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल किंवा बँक खाते उघडायचे असेल, आयकर रिटर्न भरायचे असेल किंवा घर मिळवायचे असेल, सर्व कामांसाठी पॅन कार्ड हा एक आवश्यक डॉक्युमेंट आहे. दरम्यान, पॅनकार्डशी संबंधित असा नियम आहे की, जो तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

आयकर नियमांनुसार, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला 6 महिने तुरुंगवास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. आयकर कायदाच्या आयकर अधिनियम 1961 च्या सेक्शन 272B अन्वये दोन पॅन कार्ड ठेवणाऱ्यांना 6 महिने तुरुंगवास किंवा दहा हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

दोन पॅनकार्ड असतील तर एक सरेंडर करा
आयकर विभागाकडून पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, पण कार्ड बनवताना चुकून दोन पॅन कार्ड बनले असतील किंवा तुमच्याकडे आधीच दोन कार्ड असतील, तर पहिल्यांदा यापैकी एक पॅन कार्ड सरेंडर करण्याचा विचार करा. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे बेकायदेशीर आहे. जर तुम्ही चुकून दोन पॅनकार्ड बनवले असतील, तर त्यातील एक लगेच सरेंडर करा.

कसे करता येईल पॅन सरेंडर?
आयकर विभागाने एकापेक्षा जास्त पॅनकार्ड सरेंडर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने एक्स्ट्रा असलेले पॅन कार्ड सरेंडर करू शकता. पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया अशी आहे की, आयकर वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही येथून तुमचा वार्ड शोधू शकता. त्यानंतर तेथील अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही पॅन कार्ड सरेंडर करू शकता.

अशाप्रकारे पूर्ण होईल प्रक्रिया
पॅन कार्ड सरेंडर करण्यासंबंधी अर्ज करताना तुम्हाला 100 रुपयांचा बाँड भरावा लागेल. वॉर्ड अधिकारी आपल्या पॅन कार्डच्या माहितीसंबंधी एक रिसिप्ट देईल. यासोबत काही ओरिजनल डॉक्युमेंट सुद्धा जमा करावे लागतील. यानंतर काही दिवसांत  पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

Web Title: pan card holders should be aware about this it rule otherwise has to face jail or 10k penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.