Join us

PAN Card : पॅन कार्डवरील तुमचा फोटो बदलायचाय? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 12:48 PM

PAN Card : तुमच्या पॅनकार्डवरील फोटोमध्ये काही दोष असल्यास तुम्ही तो बदलू शकता.

ठळक मुद्देपॅनकार्ड हे प्राप्तिकर विभागाद्वारे देण्यात येते. हे ओळख दस्तऐवज म्हणून देखील उपयुक्त आहे.

नवी दिल्ली : भारतात सध्या पॅन कार्ड प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज (डॉक्युमेंट) आहे. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, क्रेडिट कार्ड किंवा आर्थिक व्यवहार करायचे असले तर तुमच्याकडे  पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.

कायमस्वरूपी खाते क्रमांक (Permanent Account number) हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक इतिहासाची संपूर्ण नोंद ठेवतो. पॅनकार्ड हे प्राप्तिकर विभागाद्वारे देण्यात येते. हे ओळख दस्तऐवज म्हणून देखील उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत तुमच्या पॅनकार्डवरील फोटोमध्ये काही दोष असल्यास तुम्ही तो बदलू शकता.

PAN Card वरील फोटो बदलण्यासाठी असे करा...- सर्वात आधी NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.- त्यानंतर Application Type ऑप्‍शनवर क्लिक करून Changes or correction in existing PAN Data ऑप्‍शन सिलेक्ट करा.- आता कॅटगरी मेनूमधून Individual ऑप्शन सिलेक्ट करा.-  यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून सबमिटवर क्लिक करा.- आता पॅन अॅप्लिकेशनवरून पुढे जा आणि KYC चा ऑप्शन सिलेक्ट करा.- यानंतर Photo Mismatch आणि Signature Mismatch चा एक ऑप्शन दिसून येईल.- याठिकाणी तुम्ही फोटो बदलण्यासाठी Photo Mismatch च्या ऑप्शनवर क्लिक करा.-  आता आई-वडिल यांची माहिती भरा, त्यानंतर Next बटनवर क्लिक करा.- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज ओळख प्रमाणपत्र, अॅड्रेस प्रूफ आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ अॅटॅच करा.- यानंतर Declaration वर टिक करून Submit बटनवर क्लिक करा.- फोटो आणि सहीमध्ये बदल करण्यासाठी अर्ज शुल्क भारतात १०१ रुपये (जीएसटीसह) आणि भारताबाहेरील पत्त्यासाठी १०११ रुपये (जीएसटीसह) आहे.- पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर १५ अंकांची पावती मिळेल.- अॅप्लिकेशनची प्रिंटआऊटला प्राप्तिकर पॅन सर्व्हिस युनिटला पाठवा.- पावती नंबरवरून अॅप्लिकेशनला ट्रॅक केले जाऊ शकते.

बनू शकते इंस्टंट पॅनकार्डप्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, इंस्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड जारी करण्यास जवळपास १० मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ७ लाख पॅनकार्ड देण्यात आली आहेत.

पॅनकार्ड तयार करण्यासाठी लागतात ही कागदपत्रेपॅनकार्ड तयार करण्यासाठी संबधित व्यक्तीकडे पुरावा म्हणून ओळखपत्र, अॅड्रेस प्रूफ आणि डेट ऑफ बर्थचे प्रूफ असणे आवश्यक आहे. या ओळखपत्रांत तुम्हाला अनेक पर्याय दिले जातात. या पुराव्यांसाठी आपण एखाद्या कागदपत्राची निवड करू शकता. 

टॅग्स :पॅन कार्डव्यवसायतंत्रज्ञानइन्कम टॅक्स