Join us

तुमच्याकडे किती LIC पॉलिसी आहेत? लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा होईल नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 3:03 PM

PAN Link With LIC Policy: हे काम तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करू शकता. कसे? जाणून घ्या...

PAN Link With LIC Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही भारतातील सर्वांत मोठी आणि आघाडीची विमा कंपनी आहे. कोट्यवधी देशवासीयांना LIC च्या विविध प्रकारच्या पॉलिसी घेतल्या आहेत. पॉलिसींमधील वैविध्य आणि काळानुरुन योजना हे LIC च्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असल्यामुळे इतक्या वर्षांनंतरही एलआयसीवरील देशवासीयांचा विश्वास कमी झालेला नाही. आयकर विभागानुसार, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड अवैध ठरू शकेल. एलआयसी पॉलिसीधारकांना आपल्या सर्व पॉलिसीशी पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. बाजार नियामक सेबीनेही असाच नियम बनवला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे एलआयसी पॉलिसीलाही पॅनशी लिंक करण्यास सांगितले जात आहे. तुम्ही अद्याप पॉलिसी पॅन कार्डशी लिंक केली नसेल तर तुम्ही ते घरबसल्या ऑनलाइन करू शकता.

LIC पॉलिसी पॅनकार्डशी कशी लिंक करावी?

- एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या यादीसह पॅन माहिती द्या.

- आता तुमचा मोबाईल नंबर द्या. LICकडून त्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल, तो प्रविष्ट करा.

- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

- यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड पॉलिसीशी जोडले की नाही, ते समजेल. 

घरबसल्या पॉलिसी स्टेटस कसे चेक करावे?

- एलआयसी पॉलिसीची स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.licindia.in/ ला भेट द्यावी. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

- नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा तुम्ही नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमची स्थिती कधीही तपासू शकता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एलआयसी