Join us

आता केवळ चार तासांत मिळणार पॅनकार्ड 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 9:44 AM

आता पॅन कार्डसाठी फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. आता अर्ज केल्यानंतर केवळ चार तासांमध्ये तुम्हाला पॅनकार्ड मिळू शकेल. 

नवी दिल्ली - बहुतांश सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आता पॅनाकार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे. पण पॅनकार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया अनेकांना किचकट वाटत होती. मात्र आता पॅन कार्डसाठी फार दिवस वाट पाहावी लागणार नाही. आता अर्ज केल्यानंतर केवळ चार तासांमध्ये तुम्हाला पॅनकार्ड मिळू शकेल. सीबीडीटीचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. पॅनकार्डसाठी प्राप्तिकर विभागाकडे अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष पॅनकार्ड मिळण्यासाठी किमान 10 ते 15 दिवसांचा अवधी लागतो. मात्र नव्या प्रणालीमुळे केवळ चार तासांमध्ये पॅनकार्ड मिळणे शक्य होईल. ''पॅन कार्ड काढणे सुलभ व्हावे यासाठी प्राप्तिकर विभाग एक प्रणाली घेऊन येत आहे. या प्रणालीमुळे वर्षभरानंतर आम्ही केवळ चार तासात पॅन कार्ड देण्यास सक्षम होऊ,'' असे सुशील चंद्रा यांनी सांगितले.  

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसाय