Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या...

मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या...

PAN कार्ड हे आपल्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:07 PM2024-07-18T22:07:43+5:302024-07-18T22:08:14+5:30

PAN कार्ड हे आपल्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे.

PAN For Children: Is PAN card required for minors? How to apply for this? Find out | मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या...

मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या...

How To Apply For PAN Card : PAN कार्ड हे आपल्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हे पॅन कार्ड फक्त प्रौढांनाच नाही, तर काही विशिष्ट कारणांसाठी अल्पवयीनांनादेखील जारी केले जाते. आयकर विभागाच्या कलम 160 नुसार, पॅन कार्ड जारी करण्यासाठी किमान वयाची अट नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलेही पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतात. एवढंच नाही, तर पाच वर्षांखालील बालकाचेही पॅन कार्ड काढता येते. यासाठी त्याच्या पालकांना अर्ज करावा लागतो. आता जाणून घेऊ, अल्पवयीन मुलांना पॅन कार्डची गरज का आहे?

मुलाचे पॅन कार्ड कधी आवश्यक आहे?
जेव्हा पालक मुलाच्या नावावर गुंतवणूक करतात, तेव्हा पॅन कार्ड आवश्यक असते. या व्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या गुंतवणुकीचा नॉमिनी बनवले जाते, तेव्हा अल्पवयीन व्यक्तीलाही पॅन कार्ड आवश्यक असते. तुम्ही मुलांच्या नावाने बँक खाते उघडले किंवा अल्पवयीन मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते (SSY) उघडले, तेव्हा मुलाचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतात . एखादा अल्पवयीन तरुण/तरुणी काम करत असेल आणि त्याला आयटीआर भरण्याची गरज असेल, तर तो पॅन कार्ड मिळवू शकतो. 

मुलाच्या पॅनकार्डसाठी अर्ज कसा करावा?
अल्पवयीन मुले स्वतःचे पॅन कार्ड बनवू शकत नाहीत. त्यांच्यावतीने पालक अर्ज करू शकतात. पॅन कार्डसाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन, दोन्ही पद्धतीने करता येतो. अल्पवयीन व्यक्तीसाठी पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अशी आहे-

1. सर्वप्रथम NSDL वेबसाइटवर जाऊन फॉर्म 49AA डाउनलोड करा.
2. आता अर्जदाराचे वैयक्तिक तपशील भरा.
3. अल्पवयीन व्यक्तीची छायाचित्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा.
4. यानंतर पालक किंवा पालकांची स्वाक्षरी अपलोड करा.
5. यानंतर पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करा.
6. अर्जाच्या स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल.
7. पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला 15 दिवसांच्या आत पॅन कार्ड मिळेल.

ऑफलाइन अर्ज कसा करावा
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट किंवा NSDL कार्यालयातून फॉर्म 49A मिळवा.
2. फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरा आणि सबमिट करा.
3. मुलाची दोन छायाचित्रे आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
4. आता भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे शुल्कासह जवळच्या NSDL कार्यालयात जमा करा.
5. पडताळणीनंतर, तुमचे पॅन कार्ड दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल.

अल्पवयीन व्यक्तीच्या पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
1. पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा
2. अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / रेशन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार ओळखपत्र)
3. पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड/पोस्ट ऑफिस पासबुक/मालमत्ता नोंदणी दस्तऐवज/रहिवासी प्रमाणपत्र)

अल्पवयीन मुलांना दिलेल्या पॅनकार्डवर त्यांचे छायाचित्र किंवा स्वाक्षरी नसते. ओळखीचा योग्य पुरावा म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकत नाही. मुले 18 वर्षांची झाल्यानंतर त्यांचे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी अर्ज करावा लागतो.

Web Title: PAN For Children: Is PAN card required for minors? How to apply for this? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.