Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक

२ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक

कोणकोणत्या व्यक्तीला पॅन काढणे अनिवार्य आहे? : आयकरातील कलम १३९ अ अनुसार जर व्यक्तीचे उत्पन्न बेसिक एक्झेम्पशन मर्यादेपेक्षा जास्त असेल, किंवा त्याची वार्षिक उलाढाल

By admin | Published: June 6, 2016 02:19 AM2016-06-06T02:19:00+5:302016-06-06T02:19:00+5:30

कोणकोणत्या व्यक्तीला पॅन काढणे अनिवार्य आहे? : आयकरातील कलम १३९ अ अनुसार जर व्यक्तीचे उत्पन्न बेसिक एक्झेम्पशन मर्यादेपेक्षा जास्त असेल, किंवा त्याची वार्षिक उलाढाल

Pan required for purchase and sale on 2 lakh | २ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक

२ लाखांवरील खरेदी व विक्रीवर पॅन आवश्यक

कर नीती भाग १३२ - सी. ए. उमेश शर्मा
कोणकोणत्या व्यक्तीला पॅन काढणे अनिवार्य आहे? : आयकरातील कलम १३९ अ अनुसार जर व्यक्तीचे उत्पन्न बेसिक एक्झेम्पशन मर्यादेपेक्षा जास्त असेल, किंवा त्याची वार्षिक उलाढाल रु. ५ लाखांपेक्षा जास्त असेल किंवा त्याची कर कपात होत (टीडीएस) असेल तर पॅन काढणे अनिवार्य आहे.
पॅन नसेल तर त्याने काय करावे?: जर कोणत्याही व्यक्तीचा व्यवहार वर दिलेल्या यादीमध्ये मोडत असेल व त्याच्याकडे पॅन नसेल तर त्याने आयकराचा फॉर्म ६0मध्ये डिक्लेरेशनन द्यावे. तसेच ज्या व्यक्तीला शेतीचे उत्पन्न मिळते व त्याचे इतर कोणतेही उत्पन्न नाही त्याने फॉर्म ६१ दाखल केला तर त्याला पॅन नमूद करण्याची गरज नाही. तसेच विशिष्ट अनिवासी व्यक्तीला पॅन नमूद करण्याची गरज नाही.
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ जानेवारी २0१६पासून कोणत्याही व्यक्तीने दोन लाखांच्या वर खरेदी किंवा विक्री करताना पॅन द्यावा लागणार आहे म्हणे. ही आयकरातील कोणती तरतूद आहे.
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, व्यक्तीने पॅन केव्हा काढणे, पॅन नंबर कोठे नमूद करणे हे आयकर कायद्यामध्ये दिले आहे. बँक अकाउंट उघडताना, अचल संपत्तीचे व्यवहार करताना पॅन नमूद करणे आवश्यक आहे हे सर्वांना माहीतच आहे; परंतु १ जानेवारी २0१६पासून कायद्यामध्ये कळत नकळत बदल करून प्रत्येक खरेदी-विक्री रु. २ लाखांच्या वर असल्यास पॅन नमूद करणे अनिवार्य केले आहे. अनेकांना अशा व्यवहारांवर हा बदल माहीत नसल्यामुळे पॅन नमूद करण्यात येत नाही. खरेदी करणारा व विक्री करणारा दोघांवरही पॅन नमूद करण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने या तरतुदी लक्षात घेऊन व्यापार करणे गरजेचे आहे; अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील.
अर्जुन : कृष्णा, कोणकोणत्या व्यवहारांत पॅन नमूद करणे आवश्यक आहे?
कृष्ण : अर्जुना, आयकरातील कलम १३९ अ अनुसार पॅन नमूद करावयाचे दिले आहे व आयकर नियम ११४ ब अनुसार व्यवहाराचे प्रकार व मर्यादा दिल्या आहेत. त्यातील मुख्य व्यवहार व त्यांच्या मर्यादा खालीलप्रमाणे आहे -
१) प्रत्येक व्यक्तीला (तो व्यापारी असो वा नसो) रु. २ लाखांवरील खरेदी व विक्रीच्या प्रत्येक व्यवहारामध्ये पॅन नमूद करावा लागेल. उदा. कापड दुकानदाराने जर ठोकमध्ये ३ लाख रुपयांची खरेदी केली तर त्याला त्याचा पॅन विक्री करणाऱ्याला द्यावा लागेल व विक्री करणाऱ्याने तो पॅन तपासून व्यवहाराच्या सर्व कागदपत्रांवर जसे विक्री बिल इ.वर नमूद करावा. आयकर विभागाने पॅन देण्याची व नमूद करण्याची जबाबदारी खरेदी करणारा व विक्री करणारा दोघांवरही दिली आहे. ही तरतूद १ जानेवारी २0१६पासून लागू केली आहे.
२) टू व्हीलर सोडून इतर कोणतीही मोटार गाडी खरेदी करताना पॅन द्यावा लागेल.
३) बँक अकाउंट किंवा डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी पॅन द्यावा लागेल.
४) हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे रु. ५0 हजारांवरील रोखीने पेमेंट करताना पॅन द्यावा लागेल.
५) विदेशात प्रवास करण्यासाठी किंवा विदेशी चलन घेताना रु. ५0 हजारांच्या वर रोखीने असेल तर पॅन द्यावा लागेल.
६) बँकेमध्ये डिपॉझिट ठेवण्यासाठी किंवा म्युच्युअल फंड विकत घेण्यासाठी पॅन द्यावा लागेल.
७) रु. १0 लाखांपेक्षा जास्त अचल संपत्तीचे व्यवहार करताना पॅन द्यावा लागेल.
८) ज्या व्यवहारांमध्ये टीडीएस किंवा टीसीएस करावा लागतो त्यासाठी पॅन नंबर द्यावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, जर करदात्याने पॅन नमूद केला नाही, तर काय होईल?
कृष्ण : अर्जुना, जर करदात्याने वर दिलेल्या व्यवहारामध्ये पॅन नमूद केला नाही, तर आयकर अधिकारी कलम २७२ ब मध्ये रु. १0 हजारांपर्यंत दंड लावू शकतात.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, आपल्या देशात अनेक व्यक्ती अनेक प्रकारचे व्यवहार करीत असतात. जसे लग्नानिमित्त खरेदी, व्यापारासाठी खरेदी इ. बऱ्याच व्यक्ती ही खरेदी हिशेबात घेत नाहीत. अशा खरेदी व विक्रीच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाने पॅन नंबरची तरतूद १ जानेवारी २0१६पासून लागू केली आहे. ही तरतूद सर्वसामान्य माणसालाही लागू आहे. यामुळे काही प्रमाणात तरी असे व्यवहार पुस्तकात येतील व शासनाचा महसूल वाढेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Pan required for purchase and sale on 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.