जापानमध्ये ४ वर्किंग डेज कल्चरला स्वीकारणाऱ्या कंपन्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. याचा उद्देश कर्मचारी कर्मचाऱ्यांना उत्तम वर्क-लाईफ बॅलन्सच्या सुविधा देणं हे आहे. Panasonic Corp. ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीनं आपल्या कर्मचार्यांसाठी पर्यायी चार दिवसीय कामकाजाचा आठवडा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ओसाका-आधारित दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी साइड जॉब करण्याची आणि वॉलेंटिअर मार्गाने कोणतेही काम करण्याची परवानगी देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ Yuki Kusumi यांनी गेल्या आठवड्यात कंपनीच्या इन्व्हेस्टर्सना यासंदर्भातील माहिती दिली.
"आमच्या ह्युमन कॅपिटलला उत्तम वर्क स्टाईल आणि लाईफस्टाईल देण्याची जबाबदारी आमची आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पार्टनरची ट्रान्सफर अन्य ठिकाणी झाल्यानंतर घरून काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे," अशी प्रतिक्रिया कुसुमी यांनी दिली. पॅनासॉनिक ही पहिली कंपनी नाही ज्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांना ४ दिवसांचा कामाचा आठवडा दिला आहे. Amazon.com Inc नं २०१८ मध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यांना पायलट आधारावर चार दिवसांचं वर्किंग सुरू केलं होतं. याप्रकारे Unilever Plc नं डिसेंबर २०२० मध्ये न्यूझीलंडमधील आपल्या कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा वर्किंग विक ट्रायल आधारावर एका वर्षासाठी सुरू केला होता. आयर्लंड आणि आइसलँडनंमध्येदेखील अशा प्रकारची पद्धत लागू करण्यावर विचार केला जात आहे.