Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्राप्तिकर दात्यांची संख्या ४ कोटींवरून पोहोचली ६.२६ कोटींवर

प्राप्तिकर दात्यांची संख्या ४ कोटींवरून पोहोचली ६.२६ कोटींवर

गेल्या वित्त वर्षाच्या अखेरीस प्राप्तिकर दात्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून ६.२६ कोटींवर गेली आहे. आधी ती ४ कोटी होती. केंद्रीय थेट कर बोर्डाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:16 AM2017-07-29T04:16:01+5:302017-07-29T04:16:07+5:30

गेल्या वित्त वर्षाच्या अखेरीस प्राप्तिकर दात्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून ६.२६ कोटींवर गेली आहे. आधी ती ४ कोटी होती. केंद्रीय थेट कर बोर्डाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली.

paraapataikara-daatayaancai-sankhayaa-4-kaotainvarauuna-paohaocalai-626-kaotainvara | प्राप्तिकर दात्यांची संख्या ४ कोटींवरून पोहोचली ६.२६ कोटींवर

प्राप्तिकर दात्यांची संख्या ४ कोटींवरून पोहोचली ६.२६ कोटींवर

नवी दिल्ली : गेल्या वित्त वर्षाच्या अखेरीस प्राप्तिकर दात्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून ६.२६ कोटींवर गेली आहे. आधी ती ४ कोटी होती. केंद्रीय थेट कर बोर्डाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली.
अनिवासी भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांचा तपशील उघड करण्याच्या मुद्द्यावरील अनिश्चितताही चंद्रा यांनी दूर केली. रिफंड देय असेल, तरच खात्यांचा तपशील उघड करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राप्तिकर दिन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना चंद्रा यांनी म्हटले की, नोटाबंदीनंतर आयकर विभागाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून कर आधार वाढल्याचे बँकांनी सादर केलेल्या वित्तीय व्यवहार स्टेटमेंटवरून दिसून येत आहे. आजच्या घडीला आम्हाला ६.२६ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरणारे (असेसीज) मिळाले आहेत. आमच्याकडे प्राप्तिकर विवरणपत्रे भरणारे ३ ते ४ कोटीच लोक आहेत, ही आता केवळ दंतकथा राहिली आहे. आता खूप बदल झाला आहे. प्राप्तिकराची विवरणपत्रे भरणाºयांच्या संख्येने आता खूप मोठी झेप घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्राप्तिकर विवरणपत्रे भरणाºयांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चंद्रा यांनी म्हटले की, कर जाळे व्यापक कसे करावे, हाच आता कर अधिकाºयांपुढील प्रश्न आहे. अधिकारी त्या दिशेने काम करीत आहेत. बेनामी मालमत्ता कायद्यात सुधारणा झाल्यामुळे कर अधिकाºयांना असे आढळून आले आहे की,
कर विवरणपत्र न भरताच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे मोठे जाळे कार्यरत आहे. त्यात असंख्य लोक अडकलेले आहेत. त्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने कार्यवाही केली आहे.
२३३ मालमत्ता जप्त करण्यात
आल्या आहेत.

चंद्रा म्हणाले की, ई-असेसमेंटचा आवाका वाढविण्यावर आम्ही आता काम करीत आहोत. सध्या केवळ ७ शहरांतच मर्यादित ई-छाननी होत होती. ती १00 शहरांत सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: paraapataikara-daatayaancai-sankhayaa-4-kaotainvarauuna-paohaocalai-626-kaotainvara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.