Lokmat Money > बिझनेस न्यूज > परेड दहा लाखांवर जमा करणाऱ्यांची

परेड दहा लाखांवर जमा करणाऱ्यांची

कृष्णा, प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. या दिवशी भारतीय एकात्मतेचे आणि शक्तीचे प्रदर्शन राजपथावर घडेल

By admin | Published: January 23, 2017 01:22 AM2017-01-23T01:22:35+5:302017-01-23T01:22:35+5:30

कृष्णा, प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. या दिवशी भारतीय एकात्मतेचे आणि शक्तीचे प्रदर्शन राजपथावर घडेल

The parade deposited by the ten-million parade | परेड दहा लाखांवर जमा करणाऱ्यांची

परेड दहा लाखांवर जमा करणाऱ्यांची

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे. या दिवशी भारतीय एकात्मतेचे आणि शक्तीचे प्रदर्शन राजपथावर घडेल, तसेच विविध राज्यांच्या परेड होणार आहेत. नोटाबंदीनुतर शासनाने १७ जानेवारी २०१७ रोजी रु. १० लाखांच्या वर रोख जमा करणाऱ्यांची परेड घेण्यासाठी नोटिफिकेशन काढले आहे म्हणे, ते काय आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, या प्रजासत्ताक दिनी सर्वत्र उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण असते. या दिवशी राजपथावर विविध परेड व झाकी उत्कृ ष्टरीत्या सादर केल्या जातात. जगभरातील अनेकांकडे लक्ष वेधलेले असते. या वर्षीचे परेडमध्ये ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची’ विशेष झांकी असेल व त्यामागे दहा लाख रुपयांच्या वरती रोख जमा करणाऱ्यांची परेड असेल असे वाटते. परेड म्हणजे करदात्यांनी केलेल्या व्यवहारांवर कर भरलेला आहे की नाही, याची चौकशी केली जाईल. कारण शासनाच्या अपेक्षेपेक्षा जास्त रोख रक्कम बँकेत डिमॉनीटायझेशननंतर जमा केली. यासाठी शहानिशा करण्यासाठी शासना लोकांना नोटिसा बजावतील. या नोटिसा काढण्यासाठी शासनाने १७ जानेवारी २०१७ रोजी माहिती गोळा करण्यासाठी नोटिफिकेशन काढले आहे. त्यासाठी अनेक निकषांद्वारे १० लाख रुपयांची मर्यादा ठेवली आहे.
अर्जुन : या नोटिफिकेशनमध्ये शासनाने काय दिले आहे?
कृष्णा : अर्जुना, आयकर कायद्यातील कलम २८४ बीए अनुसार, विशिष्ट व्यक्तींना उदा. बँक, कंपनी, टॅक्स आॅडिट लागू असणारे करदाते इ. त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती द्यावी लागते. यामध्ये द्यावयाचा माहितीचा प्रकार व रक्कम ही आयकरातील रुल ११४ इ. मध्ये नमूद केलेली आहे. म्हणजेच, या व्यक्तींना त्यांनी केलेल्या व्यवहाराची माहिती जर या रुलमध्ये मोडत असेल, तर प्रत्येक करदात्याला ही माहिती डिजिटल साइनद्वारे द्यावी लागेल. करदात्याला आयकर विभागाच्या वेबसाइटवर लॉगीन करून यासाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर, फॉर्म ६१ अ मध्ये माहिती द्यावी लागेल. हा ॅफॉर्म दाखल करावयाची अंतिम तारीख आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी ३१ मे २०१७ आहे. जर करदात्याने हा फॉर्म दाखल केला नाही, तर त्याला रु. ५०० प्रति दिवस दंड लागू शकतो, तसेच उशिरा दाखल केल्यास रु. १०० प्रति दंड लागू शकतो.
अर्जुन : कृष्णा, प्रत्येक बँकेला या रुल अनुसार कोणती माहिती दाखल करावी लागणार आहे?
कृष्णा : अर्जुना, प्रत्येक बँक किंवा पोस्ट मास्टरला खालील माहिती द्यावी लागणार आहे.
१) जर रोखीने दहा लाख रुपयांच्यावर पे आॅर्डर किंवा ड्राफ्ट कोणत्याही व्यक्तीने आर्थिक वर्षात खरेदी केले असेल तर.
२) आर्थिक वर्षात रु. ५० लाखांच्या वर रोखीने रक्कम करंट बँक खात्यामध्ये जमा केली किंवा काढली असेल तर.
३) आर्थिक वर्षात रोख रक्कम रु. १० लाखांच्या वर सेव्हिंग खात्यामध्ये जमा केली असेल तर.
४) आर्थिक वर्षात १० लाखांच्या वर फिक्स डिपॉझिट बनवले असेल तर.
५) १ लाखाच्या वर रोखीने किंवा १० लाखांच्या वर कोणत्याही प्रकारे क्रेडिट कार्डचे पेमेंट केले असेल तर.
६) ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या दरम्यान जर रोख रक्कम रु. १२. ५० लाख करंट अकाउंटमध्ये किंवा रु. २.५० लाखांपेक्षा जास्त सेव्हिंग खात्यामध्ये जमा केली असेल तर, तसेच अशा व्यक्तींना १ एप्रिल ते ९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत जमा केलेल्या रोख रक्तेची माहितीसुद्धा द्यावी लागेल. ही माहिती देण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१७ आहे.
अर्जुन : कृष्णा, शासन ही माहिती गोळा करून काय करणार आहे?
कृष्णा : अर्जुना, या माहितीच्या आधारे शासन नोटिसा पाठवणार आहे. प्रत्येक व्यक्तीला या नोटिसांची उत्तरे द्यावी लागतील. जर ती मान्य झाली, तर पुढची कार्यवाही होणार नाही. ज्या व्यक्तीची उत्तर अमान्य राहतील, त्यांना आयकर अधिकारी या शासनाने आणलेल्या गरीब कल्याण योजनेत जावयास प्रवृत्त करतील असे वाटते. अन्यथा जबर दंड व व्याजासोबत कर वसूल केला जाईल. शासनाने या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील अनेक बाबींचे स्पष्टीकरण देण्यासाठी १८ जानेवारी २०१७ ला प्रश्नोत्तरे दिली आहेत. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या ४९.९० टक्के कर भरावा लागेल व २५ टक्के बिना व्याजी बँक खात्यामध्ये डिपॉझिट म्हणून ठेवावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्णा : अर्जुना, शासन करचोरी पकडण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या व्यक्तीने रु. १० लाखांच्या वर निकषानुसार व्यवहार केले, त्यांना आयकर विभागाच्या नोटिसांना सामोरे जावे लागणार आहे. ज्यांनी कर बुडविलेला पैसा बँकेत भरला असेल, त्यांनी प्रामाणिकपणे शासनाच्या योजनेत सहभागी व्हावे व सुटका करून घ्यावी अन्यथा याचे भयावह परिणामाला सामोरे जावे लागेल, तसेच प्रत्येकाने कमविलेल्या पैशावर योग्य रितीने कर भरावा व देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी व्हावे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Web Title: The parade deposited by the ten-million parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.