Join us  

पगार ₹100 कोटी; इलॉन मस्क यांनी नोकरीवरुन काढलेल्या भारतीयाने उभारली स्वतःची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 1:50 PM

इलॉन मस्क यांची विनंती नाकारल्यामुळे त्यांनी या भारतीयाला CEO पदावरुन हटवले होते.

Parag Agarwal Story : आज जगभरातील अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीयांची निवड केली जात आहेत. जगातील प्रमुख आयटी कंपन्यांच्या प्रमुखपदीही अनेक भारतीय व्यक्ती काम करत आहेत. अशाच भारतीयांमध्ये पराग अग्रवाल यांचेही नाव आघाडीवर आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची Twitter(आताचे X) च्या सीईओपदी निवड झाली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांचे सॅलरी पॅकेज तब्बल 100 कोटी रुपये होते. पण, पुढे Elon Musk यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर पराग यांची कंपनीतून हकालपट्टी केली. नोकरी गमावल्यानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही आणि आज ते स्वतःची कंपनी चालवत आहेत.

Tesla आणि SpaceX सारख्या कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये $44 अब्जांना Twitter विकत घेतले. यानंतर त्यांनी त्यात अनेक मोठे बदल केले. मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून X केले, ब्लू टिकसाठी मासिक फी आकारने सुरू केले आणि अनेक कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढून टाकले. तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांचेही यात नाव होते. 

पराग अग्रवाल यांना का काढले?IIT पदवीधर असलेल्या पराग अग्रवाल यांना ट्विटरचे सीईओ बनवल्यानंतर जगभरात त्यांची चर्चा सुरू झाली. ट्विटरचे सीईओ म्हणून काम करत असताना पराग अग्रवाल यांचे वार्षिक वेतन 100 कोटी रुपये होते. एका रिपोर्टनुसार, पराग अग्रवाल यांनी इलॉन मस्क यांच्या खाजगी जेटचे लोकेशन ट्रॅक करणारा अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती नाकारली होती. ही घटना ट्विटरच्या अधिग्रहणापूर्वी घडली होती. त्यामुळेच मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर तडकाफडकी पराग अग्रवाल यांना कामावरुन काढून टाकले.

पराग यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीअसा दावा केला जातो की, कामावरून काढून टाकल्यानंतर पराग अग्रवाल सुमारे 400 कोटी रुपये घेण्यास पात्र होते, परंतु त्यांना कोणतीही रक्कम देण्यात आली नाही. पराग आणि ट्विटरच्या इतर माजी अधिकाऱ्यांनी मस्कविरोधात खटला दाखल केला. एकूण 1000 कोटींच्या नुकसानभरपाईसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता.

पराग अग्रवाल यांनी चमत्कार केलादरम्यान, एवढ्या मोठ्या कंपनीच्या प्रमुख पदावरुन काढून टाकल्यानंतर कोणताही व्यक्ती खचून गेला असता. पण, पराग अग्रवाल यांनी खचून न जाता स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी Ai सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि स्वतःची कंपनी सुरू केली. त्यांच्या नवीन उपक्रमासाठी ₹249 कोटींचा निधीही मिळाला. त्यांचे स्टार्टअप OpenAi ChatGPT तंत्रज्ञानाप्रमाणेच सॉफ्टवेअर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटरपराग अग्रवालव्यवसायतंत्रज्ञान