Join us

पार्ले-जी बिस्किटने बाजारात आणले नवे फ्लेवर्स; नेटकऱ्यांनी जुन्या काळातील बिस्किटची आठवण काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 16:15 IST

देशात पार्ले-जी बिस्किट अनेकांना आवडतात. प्रत्येकाच्या घरी पार्ले-जी बिस्किट असतेच. लहानपणी हे बिस्किट आपल्यासाठी खूप प्रिय आहे.

देशात पार्ले-जी बिस्किट अनेकांना आवडतात. प्रत्येकाच्या घरी पार्ले-जी बिस्किट असतेच. लहानपणी हे बिस्किट आपल्यासाठी खूप प्रिय असते. देशात पार्ले-जी हे बिस्किट प्रसिद्ध आहे. सध्या पार्ले-जीने बाजारात नवे प्रोडक्ट लाँच केले आहेत. या बिस्किटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.    

अनेक भारतीयांसाठी पार्ले-जी बिस्किट लहानपणाचे प्रतीक आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने एका विशिष्ट पार्ले-जी पॅकचा फोटो शेअर केला आहे. @hojevlo या वापरकर्त्याने ट्विटरवर "ओट्स आणि बेरी" असे लेबल असलेल्या पार्ले-जी बिस्किटाचा फोटो शेअर केला आहे. पार्ले-जी कंपनीने सध्या बाजारात अनेक फ्लेवर्स लाँच केले आहेत.  ते सध्या देशभरात विकले जात आहेत.

घरीच सुरू करा 'हा' व्यवसाय! तुमची दर महिन्याला होईल मोठी कमाई

या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत 185.9k वापरकर्त्यांनी पाहिली आहे, आणि 3,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.या त काही वापरकर्त्यांनी पहिला जुना पार्से-जी टेस्टला पसंती दिली आहे. तर काहीजण नवीन फ्लेवर टेस्ट करण्यासाठी इच्छुक आहेत.  नॉस्टॅल्जिक वाटत असलेल्या ट्विटर वापरकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आणि पार्ले-जी बिस्किटांची चव आणि पॅकेजिंग त्यांच्या तरुणपणाची आठवण करून देणारे आणि ते नेहमी परत येऊ शकतील अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे.

टॅग्स :व्यवसायपार्ले-जी