महागाईच्या काळात जर तुम्ही एकटेच कमावते असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमची गरज असते. परंतू, घर आणि ऑफिसचे काम यातून वेळ मिळत नाही. नाहीतर झोमॅटो, स्विगीसारखे बरेच पर्याय आहेत, जे पार्ट टाईम काम करण्याची मुभा देतात. परंतू, तुम्हाला असा वेळ नसला तरी तुम्ही प्रवासात असताना तासभर तरी नक्कीच जात असेल. मग या तासभराचा वापर पैसे कमविण्यासाठी करू शकता.
नोकरीतील पगाराव्यतिरिक्त जर तुम्हाला जादाची कमाई हवी असेल तर इंटरनेटवर मेल वाचून तुम्ही पैसे कमवू शकता. तसेच तुमच्या नोकरीत देखील व्यत्यय येणार नाही. तुम्ही ईमेल, एसएमएस वाचून देखील चांगली कमाई करू शकता. आजकाल अशा अनेक कंपन्या तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतात. यामध्ये धोका होण्याची देखील शक्यता असते बरं का. पण खऱ्या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करू शकता. अनेक वेबसाईट तुम्हाला ईमेल पाठवितात, ते ओपन करायचे आहेत. प्रति मेल तुम्हाला या कंपन्या पैसे देतील. जाणून घ्या या कोणकोणत्या वेबसाईट आहेत.
मॅट्रीक्समेल डॉट कॉम...ही वेबसाईट २००२ पासून काम करत आहे. या वेबसाईटद्वारे तुम्ही २५ डॉलर ते ५० डॉलर दिवसाला आरामात कमवू शकता. या वेबसाइटद्वारे तुम्ही एका तासात सुमारे 3,000 रुपये कमवू शकता.
पैसा लाईव्ह डॉट कॉमतुम्ही या वेबसाइटवर खाते खोलताच 99 रुपये दिले जातात. जर तुम्ही तुमच्या 20 मित्रांची अकाऊंट खोलली तर प्रति अकाऊंट 20 रुपये मिळतील. ही वेबसाइट ई-मेल वाचण्यासाठी 25 पैसे ते 5 रुपये देते. वेबसाइट १५ दिवसांतून एकदा चेकने पैसे देते.
senderearning.comया वेबसाइटवर अकाऊंट खोलावे लागते. येथे तुम्हाला ई-मेल वाचण्यासाठी एक डॉलरपर्यंत पैसे दिले जातात. परंतु, या वेबसाइटला सतत भेट देणे आणि ई-मेल वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही 6 महिने भेट दिली नाही तर खाते निष्क्रिय केले जाते.
महत्वाची टीप : या वेबसाईटची माहिती इंटरनेटवरील माहितीवरुन दिली जात आहे. यामध्ये फसवणूकही होऊ शकते. यामुळे वाचकांनी त्यांच्या जबाबदारीवर पुढील निर्णय घ्यावेत.