नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या शुक्रवारच्या संपामुळे बँकांच्या कामकाजावर अंशत: परिणाम झाला.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए) जेथे बळकट आहे अशा शाखांमधील रोखीचे आणि चेक्स क्लिअरन्स व्यवहारसारख्या सेवांवर परिणाम झाला. खासगी क्षेत्रातील आणि देशाची सगळ्यात मोठी स्टेट बँक आॅफ इंडियात कामकाज सुरळीत चालले. युनायटेड बँक आॅफ इंडियासह बहुतेक बँकांनी जर आठ जानेवारी रोजी संप झालाच तर शाखांचे आणि कार्यालयांचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी सध्याच्या निर्देशांनुसार प्रयत्न केले जातील असे आपल्या ग्राहकांना कळविले होते.
एआयबीईएचे महासचिव सी. एच. वेंकटाचलम म्हणाले की स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन आणि कर्मचाऱ्यांवर एकतर्फी सेवाअटी लादण्याच्या निषेधार्थ या संपाचे आवाहन २८ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ पटियाला, स्टेट बँक आॅफ हैदराबाद आणि स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर या पाच सहयोगी बँका आहेत.
राजस्थान प्रदेश बँक एम्प्लॉईज युनियनने प्रदेशातील ३० बँकांतील हजारो कर्मचारी संपात सहभागी होते असा दावा केला. यामुळे बँकांचे कामकाज झाले नाही. पंजाब बँक कर्मचारी महासंघाचे सचिव अमृतलाल यांनी शुक्रवारी सांगितले की, जिल्ह्यातील वेगवेगळ्या ७०० शाखांमधील चार हजार कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग होता.
संपामुळे जवळपास ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांवर परिणाम झाला.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर अंशत: परिणाम
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या शुक्रवारच्या संपामुळे बँकांच्या कामकाजावर अंशत: परिणाम झाला. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना
By admin | Published: January 9, 2016 12:56 AM2016-01-09T00:56:45+5:302016-01-09T00:56:45+5:30