मुंबई : भारतातील किरकोळ क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या फ्युचर समूहाने घाऊक क्षेत्रातील आघाडीची ब्रिटिश कंपनी बुकर समूहासोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या भागीदारीतून कंपनी कॅश अँड कॅरी स्टोअर्स उघडणार आहे. वॉलमार्ट आणि मेट्रो या समूहांशी थेट स्पर्धा करण्यासाठी ही भागीदारी करण्यात येत आहे. फ्युचर कंझुमर लिमिटेड (एफसीएल) आणि बुकर यांच्यातील ही भागीदारी बरोबरीची असेल. यातून आगामी तीन वर्षांत देशात ६0 ते ७0 स्टोअर्स उघडण्यात येतील. या स्टोअर्समधून स्थानिक किराणा दुकाने, हॉटेले आणि कॅटरिंग संस्थांना माल पुरविण्यात येईल.
एफसीएलचे व्हाइस-चेअरमन किशोर बियानी यांनी सांगितले की, बुकर इंडियाने कॅश अँड कॅरी नेटवर्कद्वारे गतिशील ग्राहक वस्तू उत्पादनांच्या वितरणाची अत्यंत स्वस्त यंत्रणा उभी केली आहे. छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या यंत्रणेचा वापर करू. बुकर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्लस विल्सन यांनी सांगितले की, बुकर आणि फ्युचर समूह मिळून व्यवसाय शिखराला नेऊ शकतात. मोठ्या संख्येत रिटेलर्स व ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. (प्रतिनिधी)
फ्युचर कंझुमर्स बुकर समूहासोबत करणार भागीदारी
भारतातील किरकोळ क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या फ्युचर समूहाने घाऊक क्षेत्रातील आघाडीची ब्रिटिश कंपनी बुकर समूहासोबत भागीदारी
By admin | Published: November 16, 2016 12:25 AM2016-11-16T00:25:05+5:302016-11-16T00:25:05+5:30