Join us

"पार्टी सुरूय, उद्या सुट्टीच घेतो"; कर्मचाऱ्याच्या मेसेजला बॉसचा भन्नाट रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 4:39 PM

नामवंत कंपनीचे सीईओ अंकित अग्रवाल यांनी स्वत: कंपनीतील कर्मचाऱ्यासोबतचा हा प्रसंग सांगितला आहे.

ऑफिसमधील कामातून सुट्टी घेण्यासाठी अनेक नवनवीन कारणं दिली जातात. कंपनीतील बॉसला खोटं बोलून सुट्टीचा अर्ज मंजूर केला जातो. अनेकदा सोशल मीडियावर बॉसकडे रजा मागण्यासाठी दिलेल्या कारणांचा अर्जही व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, एका कर्मचाऱ्याने चक्क माझी पार्टी सुरू आहे, मी उद्या सुट्टी घेतो, असा मसेज कंपनीतील बॉसला मध्यरात्री केला. विशेष म्हणजे यावर बॉसनेही भन्नाट रिप्लाय दिला. सध्या या सुट्टीच्या कारणाचा आणि बॉसच्या उत्तराचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. 

एका नामवंत कंपनीचे सीईओ अंकित अग्रवाल यांनी स्वत: कंपनीतील कर्मचाऱ्यासोबतचा हा प्रसंग सांगितला आहे. अंकित यांनी लिंक्ड इनवर एका व्हॉट्सअप चॅटचा मेसेज शेअर केला आहे. त्यामध्ये, एका कर्मचाऱ्याने त्यांना व्हॉट्सअपवरुन सुट्टी मागितल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याने कुठलेही नाटक न करता, कुठलीही औपचारीक कारण न देता, थेट पार्टी करत असल्याचं कारण दिलं आहे. 

गुरुवारी सकाळी ४.५४ वाजता हा व्हॉट्सअप मेसेज पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये, हाय अंकीत, खूप दिवसांनी मी तुम्हाला लेट नाईट पार्टीसाठी सुट्टी मागत आहे. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, आणि पार्टी अद्यापही सुरुच आहे. माफ करा, मी आता शुक्रवारीच ऑफिसला येईल. मी इतर टीमशी संध्याकाळी बोलून घेतो, असे कर्मचाऱ्याने लिहिले होते. कर्मचाऱ्याच्या या अर्जावर बॉसनेही दिलखुलासपणे सुट्टी मंजूर केली. ''कुल, आशा आहे कार्यक्रम मस्त सुरू असेल, कधी मलाही घेऊन चला. त्यावर, कर्मचाऱ्याने लिहिले की, निश्चित कधीही ...

अंकीत यांनी लिंक्ड इन अकाऊंटवरुन हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करुन अंकीत यांचं कौतुक केलंय. तसेच, हा स्क्रीनशॉट व्हायरलही होत आहे. बॉस असावा तर असा.. म्हणजे सुट्टी घेण्यासाठी वेगळ्या कारणांचा शोध घ्यावा लागणार नाही, असेही एकाने म्हटले आहे. 

टॅग्स :नोकरीसोशल मीडिया