Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमानप्रवासावेळी बॅगेत ‘हे’ आढळल्यास प्रवाशांना होणार दंड

विमानप्रवासावेळी बॅगेत ‘हे’ आढळल्यास प्रवाशांना होणार दंड

विमानतळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 06:14 AM2024-02-17T06:14:27+5:302024-02-17T06:15:05+5:30

विमानतळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल

Passengers will be fined if 'this' is found in the bag during flight | विमानप्रवासावेळी बॅगेत ‘हे’ आढळल्यास प्रवाशांना होणार दंड

विमानप्रवासावेळी बॅगेत ‘हे’ आढळल्यास प्रवाशांना होणार दंड

नवी दिल्ली : विमानतळाच्या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेषत: संयुक्त अरब आमिरातीसाठी (यूएई) म्हणजेच दुबईचा प्रवास करण्याची योजना आखत असलेल्यांनी नवे नियम समजून घेणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवाशांना दंड होऊ शकतो. अथवा प्रवाशांच्या बॅगेतील वस्तू विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी फेकून देऊ शकतात. 

इस्लामी नीतीनियमांचे उल्लंघन करणारे ऑईल पेंटिंग, फोटो, कार्ड, पुस्तके, नियतकालिके तसेच मूर्ती दुबईला विमानात नेता येत नाहीत. बनावट नोटा, शिजवलेले अथवा घरचे जेवण, गोठवलेले कोंबड्या आणि इतर पक्षी यांनाही विमानात बंदी आहे.

कोणत्या वस्तूंवर बंदी?
nविमान प्रवासात प्रवाशांना बॅगेत हशीश, कोकेन, पान आणि तपकीर बाळगण्यास बंदी आहे. सर्व प्रकारच्या अमली पदार्थांवरही बंदी आहे.
nप्रतिबंधित देशातून आयात होणाऱ्या वस्तूही प्रवाशांना सोबत बाळगता येत नाहीत. कच्चे हस्तिदंत, गेंड्यांची शिंगे, जुगाराचे साहित्य आणि यंत्रे, तीन अस्तरांचे मासे पकडण्याचे जाळे नेण्यासही बंदी आहे.

Web Title: Passengers will be fined if 'this' is found in the bag during flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.