Lokmat Money > बिझनेस न्यूज > लँडिंगनंतर ३० मिनिटांत प्रवाशांना मिळेल सामान; २६ फेब्रुवारीपर्यंत पालन न झाल्यास कारवाई

लँडिंगनंतर ३० मिनिटांत प्रवाशांना मिळेल सामान; २६ फेब्रुवारीपर्यंत पालन न झाल्यास कारवाई

विमानाच्या लँडिंगनंतर पुढच्या ३० मिनिटांत सर्व प्रवाशांना त्यांचे सामान मिळालेच पाहिजे, असे निर्देश नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) देशातील सातही प्रमुख विमान कंपन्यांना जारी केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 07:28 AM2024-02-20T07:28:20+5:302024-02-20T07:28:28+5:30

विमानाच्या लँडिंगनंतर पुढच्या ३० मिनिटांत सर्व प्रवाशांना त्यांचे सामान मिळालेच पाहिजे, असे निर्देश नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) देशातील सातही प्रमुख विमान कंपन्यांना जारी केले. 

Passengers will receive baggage within 30 minutes after landing; Action for non-compliance by 26 February | लँडिंगनंतर ३० मिनिटांत प्रवाशांना मिळेल सामान; २६ फेब्रुवारीपर्यंत पालन न झाल्यास कारवाई

लँडिंगनंतर ३० मिनिटांत प्रवाशांना मिळेल सामान; २६ फेब्रुवारीपर्यंत पालन न झाल्यास कारवाई

नवी दिल्ली : विमानाच्या लँडिंगनंतर पुढच्या ३० मिनिटांत सर्व प्रवाशांना त्यांचे सामान मिळालेच पाहिजे, असे निर्देश नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) देशातील सातही प्रमुख विमान कंपन्यांना जारी केले. 

अंमलबजावणीसाठी कंपन्यांना २६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. पालन झाल्यास कंपन्यांवर कारवाईचा इशारा दिला  आहे. अधिकाऱ्यांनी जानेवारीत देशातील सहा विमानतळांवर प्रवाशांपर्यंत पोहोचविल्या जात असलेल्या सामानाची देखरेख केली होती. या प्रक्रियेत सुधारणा झाली असली, तरी निश्चित केलेल्या मानकांची पूर्तता होत नसल्याचे आढळून आले होते.

नेमके काय आदेश?

संचालन, देखभाल आणि विकास करारानुसार विमानाचे इंजिन बंद झाल्यानंतर १० मिनिटांत प्रवाशांच्या सामानाची पहिली बॅग विमानतळावरील कन्वेअर बेल्टवर पोहोचली पाहिजे, तर ३० मिनिटांच्या आधी शेवटची बॅग पोहोचली पाहिजे, असे बीसीएएस जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे.

Web Title: Passengers will receive baggage within 30 minutes after landing; Action for non-compliance by 26 February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.