Join us

पासपोर्ट अ‍ॅप १० लाख लोकांनी केले डाउनलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:58 AM

देशातील कुठल्याही भागातून पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सुविधा देणाऱ्या पासपोर्ट सेवा मोबाइल अ‍ॅपला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.

नवी दिल्ली : देशातील कुठल्याही भागातून पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सुविधा देणाऱ्या पासपोर्ट सेवा मोबाइल अ‍ॅपला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याने तयार केलेले व दोनच दिवसांपूर्वीच वापरात आलेले हे अ‍ॅप या कालावधीत १० लाख लोकांनी आपापल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून घेतले आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती शुक्रवारी टिष्ट्वट करून दिली. सहाव्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त या मोबाइल अ‍ॅपचे बुधवारी सुषमा स्वराज यांच्या हस्ते उद््घाटन झाले होते. एखाद्याला पासपोर्टसाठी अर्ज करावयाचा असेल, तर तो राहात असलेल्या भागातील पासपोर्ट कार्यालयातच जाऊन त्याला ही प्रक्रिया पार पाडावी लागत असे. त्याची या मोबाइल अ‍ॅपमुळे गरज उरलेली नाही, तसेच आॅनलाइन अर्जप्रक्रियेसाठी आता संगणक किंवा प्रिंटरचीही आवश्यकता नाही.