हरिद्वार : पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचा नफा हा १०० टक्क्यांनी वाढत असून, या माझ्या कंपनीचे नेतृत्व माझ्यानंतरही माझ्यासारखा संन्यासी किंवा साधूच करील, व्यावसायिक नव्हे, असे योग गुरू बाबा रामदेव यांनी गुरुवारी येथे सांगितले.
रामदेव यांनी त्यांच्या कंपनीच्या वाढीचा तपशील देताना सांगितले की, नफा १०० टक्क्यांनी वाढतो आहे.
रामदेव म्हणाले की, ‘ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादक असलेल्या पतंजली कंपनीची २०१६-२०१७ आर्थिक वर्षातील उलाढाल १० हजार ५६१ कोटी रुपये आहे.’ हा आकडा ऐकल्यानंतर विदेशी कंपन्यांना कपालभाती (श्वासोच्छ्वासाचा व्यायाम) करावी लागेल, असे रामदेव थट्टेत म्हणाले. येत्या दोन वर्षांत पतंजली कंपनी देशातील सर्वात मोठा ब्रँड बनेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या आधी
रामदेव यांनी भारताला बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून मुक्त करण्याचा निर्धार केला होता. या बहुराष्ट्रीय कंपन्यांची तुलना त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी केली व या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात लुटण्यासाठी आल्या आहेत, असा आरोप केला.
रामदेव यांच्या शेजारी त्यांचे सहकारी व पतंजलीचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण उपस्थित होते. बालकृष्ण हे भारतातील अतिश्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले असून, आता पतंजली ही देशात ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये वेगाने वाढणारी कंपनी बनली आहे. पतंजलीची उत्पादने दुय्यम दर्जाची असल्याचा आरोप रामदेव यांनी फेटाळला. ते म्हणाले ही उत्पादने फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एफएसएसएआय) निकषांचे पालन करतात. आमचा हेतू नफा कमावणे नाही. आमच्या उत्पादनांच्या दर्जाबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. आमची महाप्रचंड खाद्य उत्पादने ही घातक रसायनांपासून मुक्त आहेत, असे ते म्हणाले.
‘पतंजली आयुर्वेदचा नफा १०० टक्क्यांनी वाढतोय’
पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीचा नफा हा १०० टक्क्यांनी वाढत असून, या माझ्या कंपनीचे नेतृत्व माझ्यानंतरही माझ्यासारखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2017 03:33 AM2017-05-05T03:33:27+5:302017-05-05T03:33:27+5:30