Join us

बाबा रामदेव यांच्यासाठी गुडन्यूज; पतंजलीतील परदेशी गुंतवणूक वाढली, शेअरमध्ये अप्पर सर्किट...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 5:18 PM

Patanjali Foods Share: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील पतंजलीचे शेअर्स मंगळवारी 7% ने वाढले.

Patanjali Foods Share: योगगुरू बाबा रामदेव यांच्या मालकीची FMCG कंपनी पतंजली फूड्सचे (Patanjali Foods) शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 7% वाढ झाली आणि हा शेअर 1424.10 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक बातमी आहे. परदेशी इनव्हेस्टमेंट फर्म GQG Partners ने मार्च तिमाहीत पतंजली फूड्समधील आपला हिस्सा वाढवला आहे. 

GQG Partners ने मार्च 2024 च्या तिमाहीत पतंजली फूड्समधील आपला हिस्सा 11.48% पर्यंत वाढवला. यापूर्वी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत हिस्सा 3.3% होता. यामुळे बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील FMCG फर्मचे शेअर्स मंगळवारी 6.62% वाढून 1424.10 रुपयांवर पोहोचले. दिवसा अखेर BSE वर पतंजली फूड्सचे शेअर्स 5.41% वाढून 1407.70 रुपयांवर बंद झाले.

वर्षभरात 45% ने वाढपतंजली फूड्सचे शेअर्स एका वर्षात 45% वाढले आहेत. तर, गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 6.57% वाढला आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून यात 10.40% ची घसरण झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 50,856 कोटी रुपये आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीशेअर बाजारशेअर बाजार