Patanjali Foods Stock Price: पतंजली आयुर्वेदची उपकंपनी असलेल्या पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये २१ ऑगस्ट रोजी ५ टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला. ब्रोकरेज फर्म सिस्टेमॅटिक्सने पतंजली फूड्सच्या शेअरसाठी कव्हरेज सुरू केलं आहे. ब्रोकरेजनं शेअरला 'बाय' रेटिंग असून प्रति शेअर २,२५९ रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. २० ऑगस्ट रोजी बीएसईवर शेअरच्या बंद किमतीपेक्षा ही २४ टक्क्यांनी अधिक आहे.
पतंजली फूड्सचा शेअर सकाळी बीएसईवर ग्रीन झोनमध्ये १८१९.९५ रुपयांवर उघडला. दिवसभरात तो मागील बंदच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी वधारला आणि १,९१३.३५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. कंपनीचं मार्केट कॅप ६८४०० कोटी रुपये आहे.
काय म्हटलंय ब्रोकरेजनं?
पतंजली आपल्या फूड बिझनेसमध्ये प्रीमियमाइजेशन मोहिमेचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलंय. याशिवाय ब्रोकरेजनं हाय-मार्जिन एचपीसी (होम अँड पर्सनल केअर) सेगमेंटच्या आगामी एडिशनवरही भर दिला. विशेषत: पर्यायी चॅनल्समध्ये वितरणाच्या विस्तारासाठी मोठी संधी असल्याचं सिस्टेमॅटिक्सनं सांगितले. शिवाय, कंपनीने आपली विश्वासार्हता वाढविण्यासाठी आणि भागधारकांप्रती आपली वचनबद्धता दर्शविण्यासाठी अनेक पावलं उचलली असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत पतंजली फूड्सचा स्टँडअलोन निव्वळ नफा ३ पटीनं वाढून २६२.९० कोटी रुपये झाला. वर्षभरापूर्वी तो ८७.७५ कोटी रुपये होता. कंपनीचं उत्पन्न वार्षिक आधारावर ७,२०२.३५ कोटी रुपयांवर आलं आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ७,८१०.५० कोटी रुपये होतं.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)