Join us

पतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा - रामदेवबाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 7:09 AM

रामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत.

मुंबई : योगगुरू रामदेवबाबा यांचा पतंजली आयुर्वेद उद्योग समूह लवकरच ग्लोबल होणार आहे. रामदेवबाबा यांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये पतंजली जागतिक बाजारात उतरणार आहे. चीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी चीन सरकारने कंपनीला १० हजार एकर जमीन आणि भांडवली साह्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

रामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. याउलट पतंजलीने या क्षेत्रात प्रचंड काम केले आहे. दरम्यान, आयकर विभागासोबतच्या वादात दिल्ली हायकोर्टाने पतंजलीची याचिका फेटाळून कंपनीला झटका दिला आहे. २०१०-११ या आढावा वर्षाचे ‘स्पेशल आॅडिट’ करण्यासाठी आयकर विभागास सहकार्य करा, असे निर्देशही कोर्टाने दिले. पतंजली समूहाने स्पेशल आॅडिटला कोर्टात आव्हान दिले होते.

टॅग्स :रामदेव बाबापतंजली