Lokmat Money > बिझनेस न्यूज > १६ सप्टेंबर रोजी ५ मोठ्या IPO ची घोषणा करणार बाबा रामदेव, सांगणार संपूर्ण प्लॅन

१६ सप्टेंबर रोजी ५ मोठ्या IPO ची घोषणा करणार बाबा रामदेव, सांगणार संपूर्ण प्लॅन

पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन व्यतिरिक्त, पतंजली लाईफस्टाईलचा आयपीओ लाँच करण्याची बाबा रामदेव यांची योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:58 PM2022-09-15T19:58:40+5:302022-09-15T20:02:45+5:30

पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन व्यतिरिक्त, पतंजली लाईफस्टाईलचा आयपीओ लाँच करण्याची बाबा रामदेव यांची योजना आहे.

patanjali yogguru Baba Ramdev will announce 5 big IPOs on September 16 will tell the complete plan business news | १६ सप्टेंबर रोजी ५ मोठ्या IPO ची घोषणा करणार बाबा रामदेव, सांगणार संपूर्ण प्लॅन

१६ सप्टेंबर रोजी ५ मोठ्या IPO ची घोषणा करणार बाबा रामदेव, सांगणार संपूर्ण प्लॅन

योगगुरू बाबा रामदेव 16 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते पतंजली समूहाच्या 5 कंपन्यांच्या आयपीओबाबत (IPO) तपशीलवार माहिती देतील. योगगुरू रामदेव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा आयपीओ लाँच करण्याची योजना आहे. बाबा रामदेव यांच्या योजनेनुसार या कंपन्या पुढील 5 वर्षात शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.

पतंजली फूड्स ही बाबा रामदेव यांची शेअर बाजारात लिस्ट झालेली एकमेव कंपनी आहे. मात्र, या कंपनीचा आयपीओ बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली आला नाही. काही महिन्यांपूर्वी, रुची सोया म्हणून सूचीबद्ध असलेली ही कंपनी पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना एका ठराव प्रक्रियेअंतर्गत विकत घेतली होती. ही कंपनी आधीच स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले होते.

बाबा रामदेव पतंजली समूहाच्या व्हिजन आणि मिशन 2027 ची रूपरेषा यादरम्यान सांगणार आहेत. त्याचबरोबर, भारताला स्वावलंबी बनवण्यात पतंजली समूहाच्या योगदानासाठी पुढील 5 वर्षांसाठी आम्ही 5 प्रमुख प्राधान्यक्रम आणि उद्दिष्ट्यांबद्दलही ते माहिती देतील.

Web Title: patanjali yogguru Baba Ramdev will announce 5 big IPOs on September 16 will tell the complete plan business news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.