Lokmat Money > बिझनेस न्यूज > या आजारावर रामबाण ठरू शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट! रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा

या आजारावर रामबाण ठरू शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट! रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा

पतंजलीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "हे संशोधन जागतिक पातळीवरील प्रसिद्ध क्लिनिकल फायटोसायन्समध्ये प्रसिद्ध आहे आहे. हे सांगताना पतंजलीला अत्यंत आनंद होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 07:59 PM2024-06-27T19:59:37+5:302024-06-27T20:00:29+5:30

पतंजलीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "हे संशोधन जागतिक पातळीवरील प्रसिद्ध क्लिनिकल फायटोसायन्समध्ये प्रसिद्ध आहे आहे. हे सांगताना पतंजलीला अत्यंत आनंद होत आहे.

Patanjali's 'Thyrogrit' product can be a panacea for hypothyroidism treatment Big claim in research report | या आजारावर रामबाण ठरू शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट! रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा

या आजारावर रामबाण ठरू शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट! रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा

योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका ग्लोबल रिसर्च रिपोर्टनुसार, पतंजलीचे Herbo- Mineral औषध 'थायरोग्रिट'वर संशोधन करण्यात आले आहे आणि हायपोथायरॉइडीझमच्या उपचारात हे औषध उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे संशोधन उंदरावर करण्यात आले आहे. या संशोधनात, हे औषध उंदरातील हायपोथायरॉइडीझमची समस्या बरी करण्यास प्रभावी असल्याचे. सिद्ध झाले आहे. महत्वाचे म्हणजे, थायरॉग्रिट हे आयुर्वेदिक औषध हायपोथायरॉईडीझमने प्रभावित थायरॉईडपासून मुक्त करू शकते, असा दावा दावा पतंजलीने केला आहे.

काय म्हणते कंपनी? -
पतंजलीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "हे संशोधन जागतिक पातळीवरील प्रसिद्ध क्लिनिकल फायटोसायन्समध्ये प्रसिद्ध आहे आहे. हे सांगताना पतंजलीला अत्यंत आनंद होत आहे. यामुळे वैज्ञानिक आणि संशोधकांनाही नव्या आयुर्वेदिक औषधी रिसर्चसंदर्भात माहिती मिळेल."

"आचार्य बालकृष्ण म्हणाले, पतंजलीचे हे यश जगभरातील थायरॉइड पीडित लोकांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे.  पतंजलीशी संबंधित सर्व लोक जगाला रोगमुक्त करण्यासाठी समर्पित." 

हायपोथायरॉईडीझम हा जगभरात एखाद्या सामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. यामुळे हृदयविकार, वंध्यत्व आणि मुलांच्या मेंदूच्या विकासात अडथळा यांसारखे दुष्परिणाम होत आहेत.
 

Web Title: Patanjali's 'Thyrogrit' product can be a panacea for hypothyroidism treatment Big claim in research report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.