- अरविंद परांजपे (अर्थसल्लागार)
‘प्रणव, ५ पांडवांपैकी तुला सगळ्यात आवडणारा वीर कोणता आणि का?’
‘अर्थातच अर्जुन!’ कारण तो लक्ष्यवेधी होता. आपल्याला ती गोष्ट माहीत आहे, ज्यात द्रोणाचार्यांनी सर्वांची धनुर्विद्येची परीक्षा घेतली होती. तेव्हा फक्त अर्जुनाने ‘मला केवळ पोपटाचा डोळाच दिसतोय,’ असे सांगितले होते. या उत्तरामुळेच त्याला बाण मारण्याची परवानगी मिळाली होती. प्रणवने उत्तर दिले.
‘पण, सर आज हा महाभारतातील प्रश्न विचारण्याचे कारण समजले नाही. मागच्या वेळी तुम्ही आम्हाला आर्थिक नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले होते. त्यानुसार आम्ही आमचा खर्च किती होतो आणि आमच्याकडे सध्या किती मालमत्ता आहे, त्याचा तपशील लिहून काढला आहे. आता पुढे कसे जायचे आहे?’ अनिता थोडीशी गोंधळलेली दिसली.
‘प्रणवने दिलेले उत्तर आजच्या आर्थिक उद्दिष्टांशी संबंधितच आहे. अर्थनियोजनातील पहिल्या दोन गोष्टी तुम्ही केल्या आहेत. आता तुम्हाला ठरवायची आहेत तुमची आर्थिक उद्दिष्टे. म्हणजेच गुंतवणूक करण्याचे प्रयोजन.’
‘सर, आम्हाला खूप पैसे हवेत आणि ते आम्ही कमावणार एवढे पुरेसे नाही का?’ प्रणवचा प्रश्न मला फारसा अनपेक्षित नव्हता. बरेचसे गुंतवणूकदार ‘चांगली योजना द्या, भरपूर रिटर्न (परतावा) हवे, आम्हाला कधी पैसे लागतील ते सांगता येत नाहीत,’ अशी संदिग्ध मागणी करतात.
‘अरे, अर्जुनाचा आदर्श तुझ्यासमोर असेल तर तू स्पष्ट आणि नेमकी उद्दिष्टे ठेवूनच काम करायला पाहिजे. तुम्ही मुले पाहिजे ते कॉलेज, ब्रँच मिळावी, म्हणून प्रचंड मेहनत करता. त्यानंतर उत्तम नोकरी आणि त्यात करिअर करण्यासाठी आटापिटा करता. हे चांगलेच आहे, पण गुंतवणूक कशाकरिता करायची, याकडे मात्र दुर्लक्ष करता.’
‘सर, तुमचं म्हणणं मला पटतंय. भरपूर पैसे मिळवून त्याचे व्यवस्थापन करणे हे पण तेवढेच महत्त्वाचे आहे हे मला आता लक्षात आलंय,’ अनिता म्हणाली.
त्यामुळेच कशाकरिता किती आणि कधी पैसे लागणार, हे ठरवणे म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवणे. प्रवासाला निघण्यापूर्वी जिथे जायचे असेल ते आधी ठरवून त्याप्रमाणे आपण त्याची तयारी करतो तसेच. तुमची आर्थिक उद्दिष्टे म्हणजे फायनान्शियल गोल्स हा तुमच्या गुंतवणुकीचा पाया असतो. ज्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. उद्दिष्टे किती वर्षांमध्ये गाठायची आहेत आणि त्यांचा प्राधान्यक्रम काय असेल, हेपण निश्चित करायचे आहे. उद्दिष्टांची काळानुसार अशी विभागणी उपयोगी ठरते.
अल्पकालीन (रँङ्म१३ ३ी१े) साधारण ३ वर्षांपर्यंत मध्यमकालीन (टी्िर४े ३ी१े) साधारण ४ ते ७ वर्षांपर्यंत
दीर्घकालीन (छङ्मल्लॅ ३ी१े) साधारण ७ वर्षांपेक्षा जास्त
‘सर, या उद्दिष्टांची अशी विभागणी करायचे काय कारण आहे?’ अनिताने विचारले.
‘उद्दिष्टपूर्तीचा कालावधी आणि गुंतवणुकीचा प्रकार यांचा जवळचा संबंध असतो. कोणता गुंतवणूक प्रकार निवडायचा हे ठरवण्याकरिता किती पैसे कधी लागणार आहेत आणि त्यांचे प्राधान्य किती आहे, हे माहीत असावे लागते. उदाहरण घ्यायचे झाले तर प्रवासाच्या कालावधी आणि कुठे जायचे, यानुसार कुठली बॅग घ्यायची ठरवतो. तसेच आर्थिक उद्दिष्टांनुसार वेगवेगळे गुंंतवणूकप्रकार निवडायचे असतात.’
‘लक्षात आलंय सर. एकच बॅग जशी सर्व प्रकारच्या प्रवासाला उपयोगी पडत नाही, तसे एकच गुंतवणूकप्रकार सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी उपयोगी पडणार नाही. असेच ना?’ अनिताने विचारले.
‘बरोबर. तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि त्यांचा अपेक्षित कालावधी यांची यादी म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्वांशी विचार-विनिमय करून बनवावी. त्यामुळे सर्वांच्या गरजा आणि अपेक्षा यांची दखल घेतली जाते आणि त्यांची बांधिलकीसुद्धा राहते.’
‘आम्ही थोडा विचार केला आहे. आमच्या कुटुंबाकरिता आम्ही अशी उद्दिष्टे ठरवू शकतो. मला कळल्याप्रमाणे कशाकरिता, कधी, किती रक्कम लागणार आणि प्राधान्यक्रम या ४ बाबी आम्ही निश्चित करायच्या आहेत.’ अनिता म्हणाली.
सर, हे बघा मी आमची ‘विश लिस्ट’ लिहून काढलीसुद्धा.
आर्थिक उद्दिष्टे : अल्पकालीन (५ वर्षांच्या आतील)
मोटारसायकल, लगेच, ५० हजार रुपये, आवश्यक वॉशिंग मशिन, लॅपटॉप - १ लाख रुपये, ६ महिन्यांत, महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्टे मध्यम कालावधीची (५ ते ८ वर्षे) ‘५ वर्षांनी नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी अग्रक्रम आहे. शिवाय आम्हाला प्रवासही करायचा आहे, पुढच्या १० वर्षांत. किती पैसे लागतील त्याचा अंदाज नाही.’ प्रणवने यादी वाचली.
‘वा, छानच. पण तू महत्त्वाच्या २ गोष्टी विसरला आहेस. अनिता तू सांगशील का?’
सर, दीर्घ कालावधीच्या उद्दिष्टांमध्ये म्हणजे १० वर्षांनंतर आमच्या मुलांच्या शिक्षणाला बरीच रक्कम लागणार. दुसरे महत्त्वाचे म्हणजे आमच्या निवृत्तीची तरतूददेखील करावी लागेल. यालाही किती पैसे लागतील काय ठाऊक.
‘अनिता, तू अगदी योग्य विचार केला आहेस. थोडा अजून विचार केल्यास आकडेदेखील तुला मांडता येतील. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपत्कालीन निधी. तुमच्या ६ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम तुम्ही बाजूला काढायला पाहिजे.’
‘सर, आता आमचे हे स्टेटमेंट आॅफ फिनान्शियल गोल्स पे करून तुम्हाला लवकरच भेटतो.’ अनिताने सांगितले.
‘छान. मात्र तुम्ही जे खर्चाचे अंदाज कराल ते आजच्या किमतीचे असणार. महागाईने त्यात कसा फरक पडेल ते आपण पुढच्या वेळी बघू,’
सौख्याचा मार्ग ‘आर्थिक उद्दिष्टातून’
अर्जुनाने ‘मला केवळ पोपटाचा डोळाच दिसतोय,’ असे सांगितले होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 11:58 PM2019-12-01T23:58:02+5:302019-12-01T23:59:15+5:30