Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पवनहंस’च्या विक्रीसाठी लवकरच निविदा

‘पवनहंस’च्या विक्रीसाठी लवकरच निविदा

हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या पवनहंस कंपनीची १०० टक्के भाग विक्री करण्यासाठी सरकार लवकरच निविदा मागविणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:27 AM2018-08-06T00:27:54+5:302018-08-06T00:27:59+5:30

हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या पवनहंस कंपनीची १०० टक्के भाग विक्री करण्यासाठी सरकार लवकरच निविदा मागविणार आहे.

'Pavanhans' will soon be available for sale | ‘पवनहंस’च्या विक्रीसाठी लवकरच निविदा

‘पवनहंस’च्या विक्रीसाठी लवकरच निविदा

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या पवनहंस कंपनीची १०० टक्के भाग विक्री करण्यासाठी सरकार लवकरच निविदा मागविणार आहे. या कंपनीत सरकारचे ५१ टक्के तर, ओएनजीसीचे ४९ टक्के भाग आहेत. सरकारने १३ एप्रिल रोजी ५१ टक्के भाग विक्रीसाठी जाहीरात दिली होती. तथापि, सरकारसोबत आम्हीही कंपनीतून बाहेर पडण्यास तयार असल्याचे ओएनजीसीने २ जुलैला कळविले. त्यामुळे आता पवनहंस कंपनीच्या १०० टक्के भाग विक्रीसाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.
सरकारने मागील वर्षीच पवनहंसमधील आपला हिस्सा विक्रीचा प्रयत्न केला होता. मात्र, ओएनजीसीच्या माध्यमातून यात सरकारचा हस्तक्षेप कायम राहील. त्यामुळे पूर्ण १०० विक्रीसाठी गुंतवणूकदारांचा आग्रह होता.

Web Title: 'Pavanhans' will soon be available for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.